Header Ads Widget

नायगावच्या तहसील कार्यालयाचा ध्वजा रोहन तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या हस्ते संपन्न -

         माधव पवार
भारतीय स्वतंत्र दिनाच्या निमित्ताने नायगाव तहसील कार्यालयाचा तिरंगा ध्वज नायगावच्या महिला तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या हस्ते विशेष मान्य वराच्या उपस्थितीत ध्वजा रोहन करण्यात आला असून यावेळी सर्व क्षेत्रातील अधिकारी व पद अधिकारी ध्वजा रोहनाच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते

जेथे परंपरांचा सन्मान नित्य आहे जन शासनातळीचा पायाच सत्य आहे येथे सदा निनादो जयगीत जागृताचे आ-चंद्रसूर्य नांदो स्वातंत्र्य भारताचे - 
दिनांक १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन हा दिवस प्रत्येक भारतीयासाठी खूप महत्वाचा दिवस असून या देशा वरील दीडशे वर्षांचे पाहिलेले स्वप्न या दिवशी म्हणजेच १५ ऑगस्ट १९४७ रोजी प्रत्यक्षात आले आणि भारताला परकीय सत्तेच्या जोखडातून सोडवण्यात आपल्या स्वातंत्र्यवीरांना यश आले पारतंत्र्याच्या अंधारात स्वातंत्र्यचा सूर्य उगवला तो हाच दिवस अतिशय महत्वाचा आहे
या देशातील जनतेनी एकतेची वज्रमूठ करून ब्रिटिशांची सत्ता उलथून टाकली हा प्रवास सोपा मुळीच नव्हता खूप हाल अपेष्टा सहन करून हा दिवस आज आपण दिनांक १५ ऑगस्ट पाहत आहोत भारत मातेला मुक्त श्वास घेताना पाहण्याचे स्वप्न या दिवशी सत्यात उतरले होते हा भारतातील राष्ट्रीय सण म्हणून उत्साहात करत आहोत 

या दिवशी लाल किल्ल्यावर आपला तिरंगी राष्ट्रध्वज फडकावला जातो देशभरात सर्व ठिकाणी ध्वजारोहन केले जाते त्याच पद्धतीने नायगावच्या तहसील कार्यालयात ही मोठया उत्साहात भारतीय स्वातंत्र दिन साजरा करण्यात आला आणि यावेळी महिला तहसीलदार मंजुषाताई भागात यांच्या हस्ते राष्ट्र ध्वज फडकवण्यात आला आहे 


Post a Comment

0 Comments