Header Ads Widget

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी पाटील सुगावे यांची निवड झाल्या बद्दल विशेष अभिनंदन

         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळ्याचे भूमिपुत्र वसंत संभाजीराव पाटील सुगावे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी निवड झाली असल्यामुळे आपल्या भूमिपुत्राचा स्वाभिमान म्हणून घुंगराळा नगरीच्या वतीने कल्याण टोल नाका ते घुंगराळा पर्यंत मोटार सायकलची रॅली काढून त्यांचे सदरच्या नगरीमध्ये भव्य स्वागत व अभिनंदन करण्यात आले आहे नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस वसंत पाटील सुगावे यांच्या स्वागतासाठी घुंगराळा नगरी सज्ज झाली होती सदरचा कार्यक्रम हा खंडोबारायाच्या दरबारात म्हणजे ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला असलेल्या पटांगणात सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीसपदी निवड ही सन २०२४ मधील होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकी बरोबर जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची पक्षांनी निवड करून त्यांच्या मोठी जबाबदारी मा.वसंत पाटील सुगावे यांच्यावर पक्षांनी टाकली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिगज नेते राष्ट्रवादीला रामराम करून भाजपा पक्षाचे प्रवेश केले होते त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ग्रामीण भागात मोठी गळती लागली असताना सुद्धा सदरची गळती भरून काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील ग्रामीण भागातला कार्यकर्ता वसंत संभाजीराव पाटील सुगावे यांनी एकनिष्ठपणे राहून पक्ष  वाढीसाठी मोठे बाजीगर ठरले होते

त्यांच्या कर्तव्यांची जाण ठेवून राष्ट्रवादी पक्षाचे दिगज नेत्यांनी सुगावे यांना पक्षाची विशेष जबाबदारी दिली आहे 

राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश चिटणीस पदी पाटील सुगावे यांची निवड झाल्या बद्दल विशेष अभिनंदन करण्यात आले आहे 

Post a Comment

0 Comments