नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथे साहित्य सम्राट लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठया उत्साहात दिनांक २८ ऑगस्ट २०२३ साजरी होत आहे
या कार्यक्रमाच्या निमित्ताने लोकस्वराज्य आंदोलनाचे संस्थापक अध्यक्ष रामचंद्र भरांडे यांच्या हस्ते ध्वजा रॊहन करण्यात आले तर याच कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ता नागेश पाटील बेलकर बळेकर यांच्या वतीने भव्य अन्न दान करण्यात येत आहे
तालुक्यातील मौजे रुई बु येथे लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती सोहळ्याच्या जाहीर सभेचे अध्यक्ष अरविंद इंगळे होते
तर विचार मंचावर शांती निकेत विद्यालयाचे गाढ अभ्यासक तथा शिक्षक अनेराये चेअरमन हांनमतराव पांडे पशु वैद्यकीय अधिकारी पी एन नवघरे नागेश पाटील बेलकर ग्रामसेवक नागोराव सूर्यवंशी सरपंच सरपंच प्रतिनिधी गजानन पाटील शिंदे उपसरपंच दिंगाबर गोरठकर डॉ किशन पवार गणपत रेड्डी तंटामुक्ती अध्यक्ष शामराव पवार गुलाब पाटील आदी यावेळी उपस्थित होतेरुई बु येथील आण्णाभाऊसाठे यांच्या जयंती सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मान्य वरांच्या हस्ते केशव गोपाळ पवार यांची सैनिक म्हणून नेमणूक झाली असल्यामुळे त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला त्याच बरोबर विध्यार्थीनी पल्लवी रामदास पवार या सुद्धा मुलीचा सत्कार करण्यात आला आहे
जयंती सोहळ्याच्या कार्यक्रमासाठी व्यंकटी पांडुरंग शिंदे शिवाजी सकाराम शिंदे देविदास बळीराम शिंदे हांनमत वाघमारे यांच्यासह आदी मान्यवर जयंती सोहळ्याला उपस्थित होते सदरील कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन रावसाहेब पवार यांनी केले तर आण्णासाठे यांची मिरवणूक दुपारी ठीक ४ वाजता निघणार आहे

0 Comments