नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या माळईकळी येथे दलित व इतर समाजात अतिशय शांतता निर्माण होऊन गाव शांततेत एक कोप्याने एकत्र नांदले पाहिजे हा डोळस विचार डोळ्या समोर ठेवून महत्वाचा आदेश दिल्यानुसार कुंटूर पोलीस ठाण्याचे दमदार सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल बहातरे यांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी दोन्ही समाजातील जेष्ठ व कनिष्ठ लोकांना बोलावून शांतता कमिटीची विशाल बैठक घेतली आहेउपविभागीय पोलीस अधिकारी बिलोली हनपटे यांच्या आदेशानुसार माळ इकळी येथे कुंटूर पोलीस ठाण्याचे विशाल एन बहातरे गाव शांततेत नांदण्यासाठी प्रयत्न करीत आहेत
कुंटूर ठाण्याचे सपोनि बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली फौजदार संजय आटकोरे व फौजदार कुसमे यांच्या पोलीस कर्मचारी चांगल्या पद्धतीने कामगिरी बजावत असल्याचे वास्तव चित्र माळइकळी येथे दिसून येत आहे
शहरी भाग असो अथवा ग्रामीण भाग असो छोट्या मोठ्या कारणावर गावातील नागरिकांच नियंत्रण सुटलेला असते त्यावेळेस दंगा नियंत्रण पथकाला पाचरण केले जाते अशाच पद्धतीने कुंटूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या माळ इकळी येते एक नाही दोन नाही असे अनेक वेळा कुंटूर पोलिसांना दंगल नियंत्रण पथकाला पाचरण करावे लागले सध्याच्या परिस्थिती मध्ये या गावात दलित व इतर समाजात वाद होत असल्याने ठाण्याचे सपोनि बहातरे यांनी सदरच्या पथकाला तैनात केले आहे
तालुक्यातील माळ इकळी हे कुंटूर पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात येते ठाण्याचे सपोनि विशाल बहातरे यांनी आपला पोलीस फौज फाटा गावात जाऊन तेथील नागरिकांची बैठक घेऊन सदरील गावातील शांतता अबाधित ठेवण्यासाठी संबंधीत गावकऱ्याची बैठक घेतली गावात शांतता राखण्याचे शांतता कमीटीच्या बैठकीत सपोनि बहातरे यांनी केले गावात शांतता पूर्ण शांतता असून तगडा पोलीस बंदोबस्त ही तैनात केला आहे

0 Comments