Header Ads Widget

आमचा नेताच लई भारी उद्या वाढदिवसाच्या निमित्ताने नायगावात उसळणार जन सामान्य माणसाचा जनसागर !!

          माधव पवार
नांदेड जिल्ह्यातील नायगाव विधानसभा मतदारसंघात २००९  ला राष्ट्रवादी कॉंग्रेस विरोधात अपक्ष अशी लढत झाली होती या लढतीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बाजूला सारून अपक्ष म्हणून उभे राहीलेले वसंतराव चव्हाण विजयी झाले होते

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या बापुसाहेब गोरठेकर यांचा अकरा हजार मतांनी पराभव करत चव्हाण विजयी झाले होते म्हणून म्हटल्या जाते आमचा नेता लई भारी या लोकनेत्याच्या वाढदिवसाला उद्या जन सामान्य माणसाचा जनसागर उसळणार आहे

सन २०१४ साली झालेल्या निवडणूकीत वसंतराव यांनी भाजपच्या राजेश पवार यांचा पराभव केला आणी दुसऱ्यांदा ते विजयी झाले होते मात्र आता या मतदार संघातील चित्र बदललेले असल्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष बापुसाहेब गोरठेकर यांनी निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये प्रवेश केला होता नायगाव विधानसभेच्या निवडणूकीत भाजपाला त्यांचा फायदा झाला होता

आमदार म्हणून वसंतराव चव्हाण यांनी दहा वर्षाच्या काळात खूप  काम केले मतदार संघासाठी त्यांनी मोठ्या प्रमाणात निधी खेचुन आणला जनसेवेसाठी सगळ चव्हाण कुटुंब कायम तत्पर राहिले म्हणूनच जिल्ह्यात त्यांची लोकप्रियता चांगलीच आहे

आमचा नेताच लई भारी उद्या वाढदिवसाच्या निमित्ताने
नायगावात उसळणार जन सामान्य माणसाचा जनसागर असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे 

Post a Comment

0 Comments