नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुका हा प्रसिद्ध ठिकाण असल्यामुळे या शहरात ग्रामीण रुग्णालय असताना सुद्धा आरोग्य विभागाच्या बेजबाबदार पणामुळे गेल्या अनेक वर्षा पासून या सदरच्या दवाखान्यामध्ये वैद्यकीय अधिकाऱ्यासह इतर पदे रिक्त असल्यामुळे कर्मचाऱ्या अभावी दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांनाला नायगाव टू नांदेड नेहमीसाठी रेफर करण्यात येत आहे
आरोग्य विभागाने सदरचे रिक्त पदे तात्काळ भरावेत आणि नायगाव टू नांदेड पेशेंट रेफर टाळावे अन्यथा अमरण उपोषण करण्याचा माणिक चव्हाण यांनी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे इशारा देण्यात आहे
जिल्ह्यातील नायगाव हे नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर असल्यामुळे या ठिकाणी बाजार पेठ सुद्धा असल्याने अनेक खेड्यापाड्यातून रात्री बे रात्री रुग्णाला उपचारासाठी नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात आणल्या जाते परंतु या ठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर पदे रिक्त असल्यामुळे रुग्णाला उपचार करणे हे मुश्किल बनले आहे
या ग्रामीण रुग्णालयातील सदरचे रक्त पदे तात्काळ भरण्यात यावे या मागणीसाठी माणिक चव्हाण यांनी भेट उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे
नायगावच्या ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह इतर पदे रिक्त असल्यामूळे लवकर लक्ष द्यावे अशा पद्धतीचे निवेदन जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या कडे युवक काँग्रेसचे नायगाव तालुका अध्यक्ष माणिक पाटील चव्हाण यांनी दिले आहे
यावेळी शिवचंद्र पाटील डांगे, सुरज पाटील शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस अभिजीत प्रकाशराव मंगरुळे, शहराध्यक्ष विद्यार्थी काँग्रेस नायगाव अक्षय पाटील नळगे, स्वप्निल नरहरे अक्षय काळे आदी कार्यकर्ते उपस्थित होते

0 Comments