Header Ads Widget

आमदारासह खासदारानी देगलूरच्या तालुका क्रीडा संकुलनाकडे लक्ष द्यावे - क्रीडा प्रेमीकाची मागणी -



नायगाव फास्ट न्यूज : नेटवर्क :- 

नांदेड जिल्ह्याचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या बिलोली देगलूर मतदार संघाचे आमदार जितेश अंतापूरकर यांनी देगलूरच्या क्रिडा संकुलनाकडे तात्काळ लक्ष घालून सदरच्या दुरवस्थाचा प्रश्न मिटवितील काय असा प्रश्न जनसामान्य माणसाला पडला असून सदरचे क्रिडा संकुलन दिनांक २० जुलै २०२३ रोजी सततधार पावसामुळे गळती लागली असल्याची चर्चा रंगायला लागली आहे

या विभागातील लोकप्रतिनिधी अशा महत्वाच्या बाबीकडे का ? लक्ष केंद्रित करत नाहीत असा प्रश्न उद्भभवला जात असून देगलूरच्या क्रिडा संकुलनाची दुरवस्था होत असेल तर या विभागाचे लोकप्रतिनिधी लक्ष देण्याची गरज भासत असल्यामुळे सदरच्या क्रीडा संकुलनाची होत असलेली दुरवस्था तात्काळ दूर करावी अशी मागणी जोर धरीत आहे

गेल्या अनेक दिवसांपासून पावसाची संततदार सुरू असल्याने  देगलूर तालुका क्रीडा संकुलात अनेक  ठिकाणी पाण्याची गळती सुरू झाली असल्यामुळे क्रीडा प्रेमी वर्गातुन नाराजी व्यक्त केल्या जात असून सदरचे करून क्रीडा संकुलनाच्या समस्या सोडवण्यासाठी जनतेसह क्रीडा प्रेमीनी मागणी करण्यात आली आहे

क्रीडा संकुलात पाण्याच्या गळती सोबत अनेक छोट्या-मोठ्या समस्या आहेत क्रीडा संकुलाच्या समस्या सोडवण्यासाठी मंगळवार दिनांक २५ जुलै रोजी देगलूरचे तहसीलदार राजाभाऊ कदम यांना निवेदन देऊन विनंती करण्यात आली आहे 

यावेळी तहसीलदार राजाभाऊ कदम यांनी क्रीडा संकुलची पाहणी करून क्रीडा संकुलच्या समस्या जाणून घेतल्या यावेळी माजी नगरसेवक प्रशांत दासरवार, सायलू तैदलवार मनोज स्वामी बस्वराज पटणे,भरत बिरादार यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील अनेकांची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments