नायगाव तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायतच्या व गावच्या महिला सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्यावर अविश्वास ठराव आणल्यामुळे नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार भगत यांच्या उपस्थितीमध्ये ठराव मंजूर करण्यात आला असला तरी त्यांचा अहवाल शासनाकडे पाठवायचा बाकी असल्याचे तहसीलदार भगत यांनी सांगितल्या आहेत
तालुक्यातील घुंगराळा ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्या विरुद्ध ७ विरुध्द २ या मतांनी ठराव मंजूर करण्यात आला असल्यामुळे सदरचा ठराव अविश्वास पारीत करण्यात आला असल्याची माहिती नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई यांनी नायगाव फास्ट न्यूजशी बोलताना सांगितल्या आहेत
घुंगराळा ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठकीच्या अध्यक्ष तथा अध्यासन अधिकारी म्हणून नायगावच्या कर्तव्यदक्ष व पुरोगामी विचाराच्या तहसीलदार मंजुषाताई भगत या उपस्थित होत्य श्रीमती सरपंच राधाबाई जोगेवार यांचा अविश्वास ठराव पारित करीत असताना कुंटूर पोलीस ठाण्याचे सपोनि विशाल नागोराव बहातरे यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार पवार यांच्यासह सुवर्णकार भार्गव, घुमे यांनी चोक बंदोबस्त ठेवला आहे
महिला सरपंच श्रीमती राधाबाई जोगेवार यांच्या मनमानी व अकार्यक्षम कारभाराला कंटाळून उपसरपंच वसंत पाटील सुगावे यांच्यासह ७ जणांनी आरोप करीत नायगावच्या तहसीलदार यांच्याकडे तक्रार केली होती. या तक्रारीवरून मा. तहसिलदार यांनी बैठक बोलावली होती.या बैठकीत सरपंच श्रीमती जोगेवार यांच्याविरुद्ध ७ सदस्यांनी अविश्वास ठराव मांडला आहे
घुंगराळा येथील महिला सरपंच यांच्या बाजूने स्वतः सरपंच एक सदस्य अशा दोघांनी बाजू मांडली असून बहुमत लक्षात घेऊन नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी अविश्वास ठराव पारीत केला असला तरी सदरील ठरावाचा आवाहल पाठवणे बाकी कारण तालुक्यात मुसळधार पावासाने पूरपरिस्थिती निर्माण झाली असल्यामुळे तहसीलदार भगत दौऱ्यावर होत्या त्यामुळे सदरचा आवाहल शासन दरबारी पाठवण्यात आला नसल्याचे सूत्रांनी सांगितले आहे
यावेळी मंडळअधिकारी कानगुले पंचायत समितीचे विस्तार अधिकारी मुखेडकर साहेब, तहसील कार्यालयाचे अववल कारकून ग्रंथी , तलाठी डावरगावे ,ग्रामविस्तार अधिकारी एच बी शिंदे ,तहसील कार्यालयाचे.अन्नमवाड,पोलीस कर्मचारी पवार घुमे आदी कर्मचारी उपस्थित होते

0 Comments