Header Ads Widget

नायगाव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत तालुक्याच्या दौऱ्यावर अनेक ठिकाणी केली पाहणी :

        माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील व ग्रामीण भागात मुसळधार पावसाने अनेक गावचा संपर्क तुटला असून या पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांच्या अनेक पिकाचे नुकसान झाले या सदर पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार मंजुषाताई भगत यांनी नायगाव तालुक्याचा दौरा करून पूर परिस्थितीची पाहणी व आढावा घेत आहेत
जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यात दिनांक २० जुलै २०२३ रोजी मुसळधार पावसामुळे भयंकर पूर परिस्थिती निर्माण झाली होती त्यांची पाहणी करण्यासाठी नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसिलदार मंजुषाताई भगत यांनी २१ जुलै २०२३ रोजी तालुक्यातील कुंचीली टाकळी बु. जोड रस्ता पुल या ठिकाणची पाहणी करून नागरिकांना वेळ प्रसंगी सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे सूचना तहसीलदार भगत यांनी केल्या आहेत
नायगावच्या कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी तालुक्यात मुसळधार पाऊस होत असल्यामुळे व पूर परिस्थिती निर्माण झाल्याने सदरच्या ठिकाणचा आढावा घेण्यासाठी नायगाव तालुक्याचा दौरा करत असल्यामुळे दिनांक २१  जुलै २०२३ रोजी अनेक ठिकाणी पाहणी करत केली व इतर ठिकाणी पाहणी करण्यासाठी जात आहेत तालुक्यात सदरच्या मुसळधार पावसामुळे नायगाव तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठे नुकसान झाले असून शेतातील पिके खरडून गेले असल्याचे वास्तव चित्र तहसीलदार मुंजाताई भगत यांनी पाहणी केली असून सदरच्या पूर परिस्थितीचा अहवाल लवकरच शासनाकडे तहसीलदार मंजुषाताई पाठवतील अशी अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे

नायगाव तालुक्यात पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे कर्तव्यदक्ष तहसीलदार मंजुषाताई भगत तालुक्याच्या दौऱ्यावर असून अनेक ठिकाणी केली पाहणी केली व प्रशासनातील कर्मचारी तहसीलदारानी सोबत पूरपरिस्थितीचा आढावा घेतला एक जबाबदारी अधिकारी म्हणून मंजुषाताई भगत यांनी पार पाडत आहेत

Post a Comment

0 Comments