Header Ads Widget

हिमायतनगरचे तहसीलदार आदित्य शेंडे यांच्या कडून शेल्लोड परिसरात ढगफुटीची केली पाहणी -


हिमायतनगर : नागोराव शिंदे  -:-

नांदेड जिल्ह्याच्या हिमायतनगर तालुक्यातील सिल्लोड परिसरात सततच्या पावसाने अचानक ढगफुटी झाली असल्यामुळे हिमायतनगरचे तहसीलदार आदित्य शेंडे यांनी पूरपरिस्थितीची पाहणी केली व सदरचा आढावा घेतला असल्याची माहिती आमचे नायगाव फास्ट न्यूजचे हिमायतनगरचे विशेष प्रतिनिधी यांनी दिली आहे 

हिमायतनगर तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार आदित्य शेंडे यांनी ढगफुटी झालेल्या परिसरातील भागातील शेलोड या गावात जाऊन पूर्व परिस्थितीची पाहणी केली यावेळी सिल्लोड येथील शेतकऱ्यांनी शेल्लोड  येथील म्हसोबा नाल्याच्या पुलाची उंची वाढविण्याच्या बाबतचे निवेदन तहसीलदार यांना दिले आहे

यावेळी तहसीलदार शेंडे यांनी तेथील ग्रामस्थांना तात्काळ पुलाची उंची वाढविण्याच्या संदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र काढून कळविणार असल्याचे निवेदन कर्त्यांना सांगितले असून सदरील निवेदन कर्त्यांची तहसीलदार आदित्य शेंडे यांनी दखल घेतली असल्यामूळे त्यांच्या कार्यप्रणालीवर सदरचे नागरिक समाधान व्यक्त केले आहे

Post a Comment

0 Comments