Header Ads Widget

घुंगराळा ते बळेगाव रुई रस्त्याचा वनवास अखेर संपला गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकराची यंत्रणा कामाला जूटली

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता गेल्या अनेक वर्षापासून बेवारस बनला होता सदरच्या रस्त्याला तेरा कोटी रुपये मंजूर झाल्याच्या नंतर या रस्त्याचा व जनतेचा वनवास अखेर संपला असल्यामुळे या रस्त्याचे दर्जेदार काम करण्यासाठी गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांची सदरच्या रस्त्याचे काम करण्यासाठी यंत्रणा कामावर जुटली आहे

तालुक्यातील घुंगराळा ते बळेगाव रुई बु रस्ता हा नायगाव उमरी धर्माबाद मुदखेड भोकर तालुक्याशी निघडीत असल्यामुळे रस्त्याच्या काम करण्यात यावे म्हणून अनेक वेळा जनतेतून मागण्या करण्यात आल्या होत्या व अनेक वेळा प्रसार माध्यमातून रस्त्याच्या संदर्भात बातम्या ही प्रकाशित करण्यात आल्या होत्या परंतु सदर बाबीचा विचार करून या रस्त्याला एकंदरीत तेरा कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे
घुंगराळा ते बळेगाव रुई रस्ता हा इतर खेड्यापाड्यापेक्षा मोठा व वरदळीचा असल्यामुळे आणि गेल्या अनेक वर्षापासून सदरचा रस्ता बेवारस असल्यामुळे या रस्त्याकडे कोणता ही राजकीय पुढारी लक्ष दिला नव्हता सदर रस्त्यासाठी नायगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजेश पवार यांनी तेरा कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून आणल्यामुळे सदरच्या रस्त्याचे काम गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी टकाटक करीत असल्याचे वास्तव चित्र दिसून येत आहे
सदरच्या मार्गावर जाणाऱ्या वाहणाला व जनतेला रस्त्या अभावी मोठा नाहक त्रास सहन करावा लागत होता याच मार्गावर राज्य परिवहन महामंडळाची बस सुद्धा नादुरुस्त रस्त्यामुळे सोडली जात नव्हती यापूर्वी या मार्गावर अनेक बसेस चालू होत्या बडापाड ते भोकर ही बस सेवा प्रथम चालू झाली त्यानंतर औराद ते भोकर त्यानंतर नरसी ते उमरी धर्माबाद ते नांदेड असे राज्य परिवहन महामंडळाची बस चालू असताना वाहतूक नियंत्रण अधिकाऱ्यांनी बंद केली आहे

सध्या पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे ह्या रस्त्यावर करण्यात येत असलेली दबई मजबूत होत असल्याने व या रस्त्यावर लागणारे मटेरियल चांगल्या पद्धतीने टाकून घ्यावे असे या रस्त्याचे काम करणारे गुत्तेदार मनोज पाटील मोरे टाकळीकर यांनी सांगत असून सदरचा रस्ता मजबूत व्हावा यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत 









Post a Comment

0 Comments