Header Ads Widget

नायगाव फास्ट न्यूजच्या दणक्याने प्रशासन आले ताळ्यावर अखेर सावरखेड ते आंतरगाव रस्त्या वरील पुलाचेकाम गुत्तेदाराने चालू केल्याने जनतेत समाधान

        माधव पवार
नायगाव तालुक्यातील सावरखेड ते आंतरगाव रस्त्यावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या बेजबाबदारपणामुळे सदरच्या पुलाचे काम रखडले होते परंतु दिनांक २५ जुलै २०२३ नायगाव फास्ट न्यूजच्या माध्यमातून पुलाचे वृत्त ऑनलाइन प्रकाशित करण्यात आले होते सदरचे वृत्त प्रकाशित होताच झोपेतले सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी खडाडून उठले आणि सावरखेड ते अंतरगाव पुलाचे काम चालू केले आहे
तालुक्यातील सावरखेड ते आंतरगाव रस्ता हा एका नामांकित गुत्तेदाराच्या मार्फत करण्यात येत असल्यामुळे सदरच्या पुलाचे काम दर्जेदार झाले असल्यामूळे काही तांत्रिक अडचणीमुळे सदरचा रस्ता रखडला असला तरी गुत्तेदारानी सदरच्या पुलावरील भरण भरण्यास सुरुवात केली असल्यामुळे या भागातील जनता गुत्तेदाराच्या कार्यप्रणालीवर समाधान व्यक्त करीत आहेत
सावरखेड ते अंतरगाव रस्त्याच्या कामाच्या संदर्भामध्ये थोडीफार दिरंगाई झाली असली तरी गुत्तेदाराने अंगाई भरून काढण्यासाठी दिनांक २६ जुलै रोजी सदरच्या  कामाला सुरुवात केली असून ऑनलाईन व्रत प्रकाशित होताच रस्त्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली  आहे

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यानी सावरखेड ते आंतरगाव रस्त्यावर असलेल्या पुलाचे काम चालू करण्यात आले असल्याचे वास्तव चित्र दिसून येत असून सदरचे पूल बांधण्यात आले असले तरी सदरचे बांधकाम कच्चे असल्याने गुत्तेदारानी भरन भरली नव्हती कारण गुत्तेदारानी जर भरण भरली असती तर पुलाला तडा बसला असता असे बोलल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments