Header Ads Widget

महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह स्व.आर आर पाटील यांच्या नेतृत्वाची गरज

        माधव पवार 
राज्याच्या राजकारणात अधून मधून राजकीय भूकंप होत असल्यामुळे राजकीय नेत्याची राजकीय धावपट्टी ढासाळत असल्यामुळे या महाराष्ट्राच्या सर्वांगीण  विकासासाठी या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे यांच्यासह आर आर पाटील यांच्या नेतृत्वाची गरज असल्याचे स्पष्ट मत राज्यातल्या जनतेतून व्यक्त होताना ऐकावयास मिळत आहे

भारतीय जनता पार्टीचे राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी पक्षा सोबत प्रमाणिक पणे काम करून राज्यातील शेतकऱ्यासह जनतेच्या हितासाठी राज्य चालविले आहे

तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्र राज्याचें माजी उपमुख्यमंत्री दिवंगत आर आर पाटील यांनी पदावर कार्यरत असताना राज्याची शेतकऱ्यांची जबाबदारी सांभाळून अनेक शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठ मोठाले निर्णय घेऊन या राज्याचा गाडा चालवण्याचे काम या दोन स्व. नेत्यांनी केले आहे

सध्याच्या परिस्थिती मध्ये या राज्याचा कारभार दळभद्री चालत असल्याने राज्याच्या राजकारणात फुटीर गट पडल्यामुळे या व राज्याचे वाटोळे नेत्याच्या माध्यमातून होत असल्यामुळे शेतकऱ्यासह जनता वाऱ्यावर वावरत असल्याचे स्पष्ट चित्र या नेत्याच्या राजकीय खेळी वरून दिसून येत आहे

महाराष्ट्र राज्याचा गाडा चांगल्या प्रकारे हाकण्यासाठी स्व. आर आर पाटील यांच्यासह गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाची गरज असून सध्याचे फोडाफोडीचे राजकारण येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याची चर्चा आहे 

Post a Comment

0 Comments