Header Ads Widget

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचं इंजिन गतीमान करण्यासाठी लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जनता स्विकारणार ?

       माधव पवार 
राज्याच्या राजकारणात राजकीय नेते मंडळी कडून राजकारणाचा चोता करणारे नेते मंडळींना धडा शिकविण्यासाठी येत्या आगामी काळातील लोकसभा व विधानसभा निवडणुकी मध्ये महाराष्ट्रातील जनता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे इंजिन स्वीकारणार असल्याची चर्चा सध्याच्या परिस्थितीत ग्रामीण भागात होताना ऐकावयास मिळत आहे
महाराष्ट्राच्या राजकारणात व नेते मंडळीत एकमेकाचा ताळमेळ एकाला लागत नसल्याने राज्याच्या विकासाची वाट लागली मंत्री संत्री पद भोगण्यासाठी पक्षात गद्दारी व बंडखोरी करत असल्यामुळे मंत्री पद भोगत असल्याने त्यांना मताची किमत दाखविण्यासाठी जनता पेटून उठत आहे

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे एक राजकारणात एकनिष्ठ पक्ष अध्यक्ष असल्यामुळे महाराष्ट्राचे नेतृत्व करण्यासाठी व मुख्यमंत्री राज ठाकरे यांना करण्यासाठी आता जनता राज ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा  राहणार असल्याची चर्चा होत आहे

राज्यात काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना पक्षात गट पडल्यामुळे या राज्यात दोन शिवसेना झाल्या आहेत वंचित बहुजन आघाडी भाजप पक्ष व इतर पक्षातील नेते मंत्री पद भोगण्यासाठी कोणत्या ही पक्षांचा झेंडा घेऊन बंडखोरी करत आहेत

राजकारणात होणारी खळबळ फोडाफोडीच्या राजकारणाला या राज्यातील जनता वैतागली असल्यामुळे यापुढे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा पक्ष बळकट करण्यासाठी मनसेचे इंजिन महाराष्ट्रात गतीमान करण्यासाठी जनता खंबीरपणे उभा राहणारा असल्याचे चित्र पाहूयास मिळत आहे 

Post a Comment

0 Comments