Header Ads Widget

मौजे लालवंडी सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी भगवानराव पा.लगंडापुरे यांची बिनविरोध निवड


ग्रामीण प्रतिनिधी : रामप्रसाद चन्नावार

तालुक्यातील मौजे लालवंडी येथील सेवा सहकारी सोसायटीची निवड प्रक्रिया अतिशय शांततेमध्ये पार पडल्यानंतर चेअरमन पदी भगवानराव पाटील लंगडापुरे यांची सर्व सदस्यांनी बिनविरोधपणे निवड केली तर व्हाईस चेअरमन पदी मारुती आनंदा बोमवाड यांची निवड बाबुराव पा.लगंडापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत व रमेश पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आणि समस्त गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवड करून गावचा मोठेपणा राखला आहे.

मौजे लालवंडी ग्रामपंचायत कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव करखेले, गादेकर यांच्या उपस्थितीत व रमेश पाटील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषदचे सदस्य बाबुराव पाटील लगंडापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये सेवा सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी भगवान शंकरराव पा.लंगडापुरे यांची तर व्हाईस चेअरमन पदी मारुती बोमवाड व संचालक पदी विश्वनाथ केरुरे, अरविंद लालवंडे, सतीश केरुरे, मारुती माधव पुपूलवाड सौ राधाबाई हाळे, सौ.पंचफुला बोंमनाळे गणपत जोंधळे यांचा गावकऱ्यांनी सत्कार करून शुभेच्छा देण्यात आले आहेत.

यावेळी अँड. नारायण लंगडापुरे,प्रा जीवन चव्हाण,प्रकाश पाटील केरुरे,रामराव बामनपल्ले, बालाजी बामनपल्ले, गुणवंत लालवंडे, शंकर भुसेवाड माजीसरपंच, शिवराम येरसनवाड,उपसरपंच गंगाधर जोंधळे, मोहन रुद्रावाड, सुनील होनराव, गणपत केरुरे, सुमित लालवंडे, नागेश भुसेवाड, व्यंकटराव इंगळे, नामदेव संगेपवार, शिवाजी केरुरे, आनंद गायकवाड, दत्ता रुद्रावाड, सुनील लालवंडीकर यासह अधिजनाची उपस्थिती होती.

Post a Comment

0 Comments