नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासन आपल्या दारी ही सदरची मोहीम प्रभावी राबविण्यासाठी काढण्यात आली होती परंतु ग्रामीण भागात सदरची शासन आपल्या दारी मोहीम ही चांगलीच बारगळली असल्यामुळे अनेकांचे कामे कोळंबून जाताना दिसून येत आहे
नायगाव तालुक्यासह ग्रामीण भागात शासनाची शासन आपल्या दारी ही मोहीम कुठे गेली असा सवाल जनतेने केला असून सदरच्या मोहिमेचा नुसताच बोजवारा झाला असल्यामुळे सरकार महत्वकांक्षी मोहीम व योजना काढतो परंतु त्यांची कुठेच नीट आणि सरळ अमलबजावणी करत नसल्यामुळे जनतेला हैराण व्हावे लागते आहे
शासन आपल्या दारी अभियानांतर्गत जिल्ह्यातील पात्र सर्व लाभार्थ्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा शासन आपल्या दारी'' अभियानाचा हेतू आहे
नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत. कन्या माझी भाग्यश्री, विविध आवास योजनांसह अन्य योजनांचा लाभ जिल्ह्यातील प्रत्येक लाभार्थ्याला मिळवून देण्यासाठी घरोघरी सर्वेक्षण करुन लाभार्थ्यांची माहिती देणे असा आहे

0 Comments