जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी राजा हा आपल्या शेतीत रक्ताचे पाणी करून शेत पिकविण्याचा प्रयत्न करत असतो नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे अतोनात नुकसान होते आणि शासनाने पिक विमाच्या नावाखाली पिक विमा भरून घेऊन शेतकऱ्यांच्या झोळीत तुटपुंजी मदत टाकते या शासनाच्या फसव्या विम्याला शेतकरी राजाने बळी पडू नये म्हणून नेते शिरीष भाऊ गोरठेयांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाचे स्व. माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांचे पुत्र शेतकऱ्यांचे कैवारी शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा मोर्चा धडकला आहे
शासनाने दरवर्षी शेतकऱ्या कडून पिक विमा मोठ्या प्रमाणात भरून घेतो परंतु शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना सुद्धा विमा कंपनी वाल्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात तुटपुंजी मदत टाकून शेतकऱ्यांच्या डोळ्याचे पाणी पुसत आहे
अशा शासनाच्या या फसव्या विमा योजनेच्या बळी शेतकरी पडत असल्यामुळे स्व. माजी आमदार पुत्र
शिरीष भाऊ गोरठेकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक ३१ जुलै २०२३ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून सदरचे निवेदन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांना देण्यात आले आहे
गेल्या वर्षांचा पिक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात थोडा फार पडला असला तरी ती तुटपुंजी मदत शेतकऱ्याला परवडत नसल्यामुळे व शेतकऱ्यांची शासन व विमा कंपनी फसवणूक करीत असल्यामुळे सदरच्या बाबीला आळा बसावा म्हणून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेते शिरीष बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी व भल्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचे आयोजन केले होते
जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या भव्य मोर्चात सहभागी होण्यासाठी शिरीष भाऊ गोरठेकर यांच्यासह जिल्ह्यातील शेकडो शेतकरी सदरच्या मोर्चात सहभाग घेतला होता शासनाला शेतकऱ्यांची कळकळ व तळमळ असेल तर शासनाने खरीप पेरणीच्या पूर्व संधेला ५० हजार रुपये शेतकऱ्यांना द्यावे उगीच शेतकऱ्यांची चेष्टा करू नये मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला आहे

0 Comments