नायगाव तालुक्यातील मौजे सावरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत गावकऱ्याच्या सहकार्याने येथील शाळेचे मुख्याध्यापक कानोले गुरुजीने शाळेच्या भिंतीवर ज्ञानाची चित्राची बाग फुलविली असल्यामुळे या सदरच्या शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंतचे विध्यार्थी दर्जेदार शिक्षण घेत असून या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या ही मोठ्या प्रमाणात असल्याचे मु.अ .कानोले गुरुजीने सांगितले आहेतालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सावरखेड येथे गावकऱ्याचे लक्ष असल्यामुळे विध्यार्थाना शिक्षणाचे धडे देण्यासाठी शासनाने एकूण नऊ शिक्षक दिले असून विध्यार्थाची संख्या हीं २६० पेक्षा अधिक असल्यामुळे ह्या शाळेत विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर पडावी म्हणून शाळेचे मुख्याध्यापक बी पी कानोले गुरुजीसह शाळेतील शिक्षक मोठे परिश्रम घेऊन शाळेच्या भिंतीवर ज्ञानाची बाग व चित्राची बाग फुलविली आहे
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सारखेड येथे विद्यार्थी च्या शिक्षणा बरोबर सदरच्या भिंतीवर फुलविलेल्या बागेच्या माध्यमातून विध्यार्थाना ज्ञान प्राप्त होत असून अशी ज्ञानाची बाग जिल्ह्यातील सर्व शाळेवर फुलविली तर नक्की शिक्षणाचा दर्जा सुधारेल या शाळेत प्रत्येक वर्गात टीव्हीची अभ्यासाठी व्यवस्था करण्यात आली आहेसावरखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत शाळा असल्यामुळे या शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणात भर घालण्यासाठी सर्व शाळेच्या भीतीवर ज्ञानाची बाग व चित्राची बाग फुलविली असल्यामुळे विद्यार्थ्यांची बुद्धी तेज मय होऊन टवटवीत असल्याचे वास्तव चित्र सावरखेडच्या जिल्हा परिषद शाळेत दिसून येत आहेसदरच्या खेडेगावातील जी.प.प्रा शाळा पाण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यासह जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत गटविकास अधिकारी व गटशिक्षण अधिकाऱ्यानी सदरच्या शाळेला आवश्यक भेट देऊन सदरील शाळेतील शिक्षणाचा व शाळेचा दर्जा पाहून घ्यावा असे शाळेच्या भिंतीवर रंगविलेल्या चित्रातून सांगते आहेशाळेचा दर्जा वाढवण्यासाठी गावकऱ्यासह शिक्षकांचे मोठे योगदान असल्यामुळे या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या मुला मुलीची मोठ्या प्रमाणात असून या ठिकाणी विद्यार्थी शिक्षण घेत आहेत अशाच पद्धतीची शाळा जिल्ह्यात झाल्या तर शिक्षणाचा दर्जा उंचावल्या शिवाय राहत नाही असे चित्र भिंतीवरून सांगताहेत
मुख्याध्यापक भाऊराव कानोले यांच्या नेतृत्वाखाली
प्रा.पदविधर संजय ठक्करवाड सतीश जानकर वि शिक्षक बाबुराव ढगे श्रीनिवास जाधव गोविंद कोंपलवाड बालाजी किसवे रमेश राजुरे सौ.अरुणा शिरायचे सरपंच धोंडिबा ईजगरे शाळेतील सर्व शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा दर्जा वाढीसाठी मोठे परिश्रम घेत आहेत

0 Comments