Header Ads Widget

शिरूर कारेगाव रांजणगाव ढोकसांगवी या परिसराला अवैद्य धंदे वाल्या माफियांनी घातला विळखा - या कडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी लक्ष देतील का ? -


पुणे / शिरूर : अनिल डांगे - 

संबंधित पोलीस ठाणे हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैद्य धंदे बोकाळले असून या सदरच्या अवैध धंदे वाल्या माफियाना चाप बसण्यासाठी पोलीस कारवाई करणे गरजेचे असल्यामूळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानी याकडे जास्तीचे लक्ष देण्याची गरज आहे

संबंधित पोलीस यंत्रणा कारवाई करण्या ऐवजी हप्ता वसुलीत मग्न असल्याची चर्चा होताना ऐकावयास मिळत असून याबाबीकडे पोलीसाचे साफ दुर्लक्ष झाले असून वरिष्ठानी तात्काळ लक्ष देऊन ? कारवाई करावी अशी मागणी होत आहे

आम आदमी पार्टी शिरूर शहराध्यक्ष अनिल डांगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी काही दिवसापूर्वी पोलीस महासंचालक, एस पी कार्यालय,पाषाण पुणे डीवायएसपी कार्यालय,रांजणगाव , शिरुर,संबंधित पोलीस ठाण्याचे पीआय यांना वेळोवेळी निवेदन पुरावे दिलेले आहेत.स्वच्छ प्रतिमा असलेले पोलीस अधीक्षक  अंकिता गोयल यांनी कारवाई करावी अशी मागणी होत आहे 

गावातील नागरिकांकडून मागणी होत आहे अशातच गुन्हेगारांची पार्श्वभूमी या परिसराला पाहता काही दिवसांपूर्वी नियुक्त झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत गवारी यांची ही भूमिका तितकीच महत्त्वाची आहे सामाजिक कार्यकर्ते,सजग नागरिकांनी आणि आम आदमी पार्टी शिरुर व कार्यकर्त्यांनी अवैद्य धंदे सुरू असल्या बाबतच्या तक्रारी केल्या आहेत

बालाजी नावाने ॲप वापरून जीएसटी चालू आहे अशी बतावणी करून अनेक लोकांना गंडवले जात आहे मटका जुगार आणि सोरट, गुटखा विक्री,लॉजवर चालणारे वेश्या व्यवसाय हे प्रकार सर्वाधिक आहे .पोलिसांनाही अवैद्य धंदे संबंधित ठिकाणी चालू असल्याचे आढळले आहे 

शिरूर शहरात नुकतेच नियुक्त झालेले पीआय श्री संजय जी जगताप साहेब यांनी आपल्या कामाची चुणूक शिरुर शहरात विविध कारवाया करून दाखवून दिली आहे

मात्र अद्याप रांजणगाव गणपती पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पी आय श्री महेश ढवाण काय भूमिका घेतात या नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे कारेगाव ,रांजणगाव ढोकसांगवी, पाचंगे वस्ती या परिसरात अवैद्य धद्यावर कारवाई का होत नाही हा सवाल आहे.सामान्य नागरिकांनी तक्रार करायची तरी कोठे असा प्रश्न निर्माण झाला आहे

लॉटरी सेंटरचे परवाने नसतानाही अनेक लॉटरी सेंटर ,मटका जुगार व इतर जुगारीचे प्रकार उघडपणे संबंधित गावांमध्ये चालू आहे अशा ठिकाणी कर्मचाऱ्यांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाचे वेगवेगळे हप्ते वसूल होतात का? गाव गावचे पोलीस पाटील तक्रारीचा अहवाल पोलिसांना देतात का असे अनेक प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित होत आहे

सर्वसामान्य नागरिकांच्या मनात उपस्थित झालेले प्रश्नाचे उत्तर रांजणगाव पोलीस स्टेशनचे नवनियुक्त पीआय आणि संबंधित अधिकारी वर्ग आपल्या कामातून देतील सर्वसामान्य नागरिकांना दिलासा देतील अशी अपेक्षा  नागरिक बाळगून आहेत.

Post a Comment

0 Comments