Header Ads Widget

घुंगराळ्यासह रुई बु येथे करण्यात आलेल्या जलसंधारण विभागाच्या मार्फत तळ्याच्या कामाचे १५ ते २० लाख रुपयाची रक्कम गुत्तेदाराना अद्याप मिळालीच नाही तात्काळ द्या - मागणी -

        माधव पवार
नायगावच्या जलसंधारण विभागा मार्फत करण्यात आलेल्या गेल्या उन्हाळ्यात पाझर तलावाची उंची वाढवणे पाळूची सुरक्षितता म्हणून पिचींग करणे आउटलेट बांधणे असे अनेक कामे करण्यात आले परंतु अद्याप गुतेदाराला सदरच्या कामाचा मोबदला अद्याप मिळाला नसल्यामुळे गुत्तेदार हैराण होत असल्याचे सांगण्यात येत आहे

तालुक्यातील घुंगराळा व रुई बु.व अन्य ठिकाणी अनेक जलसंधारण नायगाव विभागाच्या मार्फत कामे करण्यात आले परंतु गुत्तेदाराचे अंदाजे १५ ते ते २० लाख रुपयाचे थकले असल्याने सदरचे गुत्तेदार हैराण होत असल्याचे बोलल्या जात आहे

घुंगराळा रुई बु येथे पाझर तलावाचे कामे करण्यात आले यात उंची वाढवणे पिचिंग करणे आउटलेट बांधणे असे कामे जलसंधारणच्या अंतर्गत गुत्तेदारानी केले असल्याने सदरच्या कामाचा मोबदला अद्याप मिळाला नाही त्यामुळे पुढील कामे करण्यासाठी गुत्तेदार धजावत नसल्याचे स्पष्ट चित्र दिसून येत आहे

जलसंधारणच्या मार्फत छोटे छोटे तळे जर केले तर त्यांचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होतो सरकारने अगोदरच केलेल्या कामाचा मोबदला गुत्तेदाराला देत नसल्यामुळे गुत्तेदार काम करण्यासाठी तयार नसल्याचे ही वास्तव चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे 


Post a Comment

0 Comments