Header Ads Widget

राजकीय नेत्यानो याद राखा जनता कदापी माफ करणार नाही सात महिन्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुका असल्यामुळे राजकीय घोडे बाजार थांबवा

       माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी अनेक वेळा गद्दार म्हणत होते या राजकीय नेत्यांनी जनतेशी गद्दारी करून शिंदे फडणवीस सरकार मध्ये जाऊन उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असली तरी घटना बाह्य असल्यामुळे अशा राज्यातल्या गद्दारी करुन मंत्री पदावर विराजमान होणाऱ्या नेत्याना जनता कदापि माफ करणार नाही असे जनतेतून बोलल्या जात आहे

राज्यातल्या राजकीय नेत्यानो मंत्री पदाच्या मोहापायी जनतेशी घोर गद्दारी करत आहात याद राखा आगामी काळातील लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत जनता तुम्हाला जागा दाखविल्या शिवाय सोडणार नाही असे जनतेतून संताप जनक सवाल केला जात आहे

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर राजकीय टिकेची झोड उठवली होती परंतु जनतेच्या डोळ्यात धूळ फेकून ईडी सरकार मध्ये जाऊन घटना बाह्य उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असल्यामुळे राज्यात चांगलाच खेळखंडोबा झाला आहे

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेशी गद्दारी करुन राज्यात भाजपा सोबत युती करुन सत्ता स्थापन केली असल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठया प्रमाणात जनतेची दिशाभूल केली जात असली तरी येत्या आगामी काळात मात्र जनता राज्यातल्या नेत्याना अस्मान दाखविल्या शिवाय गप्प बसणार नाही असे ही चर्चा होताना ऐकावयास मिळत आहे

राज्यातल्या राजकीय नेत्यानो केवळ सात महिनेच राज्यात राजकीय घोडेबाजार करा जनता सन २०२४ च्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीत आपली जागा दाखविल्या शिवाय सोडणार नाही राज्यात फक्त मंत्री पदासाठी राजकीय संबळ वाजवणाऱ्या नेत्याना जनता धडा शिकवणारच असल्यामुळे  आता राजकीय पुढाऱ्याना आत्मचिंतन करण्याची गरज भासनार असल्याचे चित्र मात्र स्पष्ट दिसणार आहे 

Post a Comment

0 Comments