Header Ads Widget

युवकाचा खंजीरने भोसकून खून केल्या प्रकरणी आरोपी अटक उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची घटनाथळाला भेट पोलीस निरीक्षक भंडरवार यांची माहिती

       


       माधव पवार

नांदेडच्या सिडको नवीन भागातील पाण्याच्या टाकीजवळ दिवसा ढवळ्या एका युवकाचा खंजीराने भोसकून खून केल्याची घटना दिनांक १४ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी अंदाजे ४ वाजण्याच्या दरम्यान घडली सदरच्या घटनेची माहिती कळताच ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्तव्य दक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी घटनेची पाहणी करत आरोपीला अटक केले असल्याची माहिती पोनि भंडरवार यांनी दिली आहे

ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या व या घटनेतील पोलिसांनी एका आरोपीस ताब्यात घेतले असल्याची माहितीपोलीस निरीक्षक भंडरवार यांनी दिली आहे 

सदरील प्रकरणी ग्रामीण ठाण्यात कलम ३०२ दाखल करण्यात आला असून नांदेड वाघाळा महापालिकेच्या हद्दीत असलेल्या आजदवन येथील अवधूत काळबा गिरडे वय २० वर्षे या युवकास जुन्या भांडणाच्या कारणावरून सिडको येथील पाण्याच्या टाकीजवळ खंजीरने भोसकून व दगडाने ठेचून युवकाचा खून केल्याची घटना घडली आहे 

या खून प्रकरणी ग्रामीण पोलिस ठाण्याचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक जगदीश भंडरवार सदर प्रकरणी एका युवकास ताब्यात घेतले असल्याचे पोलिसांनी दिली असली तरी उपविभागीय पोलिस अधिकारी गुरव तसेच गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक द्वारकादास चिखलीकर ग्रामीण ठाण्याचे पोलिस निरीक्षक जगदीश भंडरवार यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली आहे

सदरील घटनेतील आरोपीला तात्काळ अटक करण्यासाठी पोलिसांना सूचना दिल्या होत्या त्यानुसार सदरच्या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती  पोलीस निरीक्षक भंडरवार यांनी दिली असून अशा पद्धतीने वजीराबाद पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मोठी कामागिरी करत गुंड वर्तीच्या लोकांवर चांगलीच वचक ठेवली होती ग्रामीण पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या कार्यक्षेत्रात पोनि जगदीश भंडरवार यांनी लक्ष ठेवून आहेत




Post a Comment

0 Comments