माधव पवार
नांदेडच्या इतवारा पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या नाव घाट पुला वरून लोहा तालुक्यातील शेवडी येथील रहिवासी असलेल्या प्रेम युगलने शहरातील गोदावरी नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याची घटना दिनांक ८ जुलै २०२३ रोजी सकाळी साडे सात ते पावणे ८ वाजण्याच्या दरम्यान सदरची घटना घडली आहे
नांदेड येथील नाव घाट पुला वरून सदरच्या प्रेम युगलने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला परंतु एका मराठी म्हणी प्रमाणे " देव तारी त्यांना कोण मारी " या पुरातन बाबीचा विचार केला तर प्रेम युगलने ज्या पुला वरून गोदावरी पात्रात उडी मारली त्या ठिकाणी देव म्हणून जीव रक्षक दलाच्या पथकानी मोठे कामगिरी केली असल्यामुळे प्रेम युगल बालबाल बचावले आहे
लोहा तालुक्यातील शेवडी या गावचे रहिवासी सदरचे प्रेमयुगल रहिवासी असल्याचे सांगण्यात येते सदरच्या घटनेची माहिती इतवारा पोलीसाना मिळताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी रवाना झाल्याचे सांगण्यात येते
प्रेम युगलने नांदेड शहराच्या नाव घाट गोदावरी पुलावरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असला तरी नागरिकांच्या व जीव रक्षक पथकाच्या सतकर्त्यामुळे या दोघांचे ही जीव वाचविण्यात त्यांना यश मिळाले असल्याची माहिती मिळाली असली तरी या घटनेत सदरचा मजनू जखमी असल्याचे सांगण्यात येत असून सदरील घटनेची नोंद इतवारा पोलीस ठाण्यात असल्याचे समजते आहे

0 Comments