Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना आमदारकीची संधी निश्चित मिळणार ? -

        माधव पवार
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी येत्या विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार पुत्र प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांना आमदारकीची संधी मिळू शकते असे घुंगराळा येथील काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते पंडित दिंगाबरराव पाटील सुगावे यांनी अशा व्यक्त केली आहे

सध्याच्या परिस्थिती मध्ये राज्यात लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात चर्चा होत असल्यामुळे नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघाच्या नेतृत्वासाठी व विकासासाठी राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विचार श्रेणीतून प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना आमदारकी संधी मिळू शकते असे पंडीत पाटील सुगावे यांनी मत व्यक्त केले आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव प्रा.रवींद्र पाटील चव्हाण यांना आमदारकीची संधी मिळू शकते असा विश्वास पंडित पाटील सुगावे यांनी व्यक्त केला आहे 

नायगाव विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व करण्यासाठी माजी आमदार वसंतराव चव्हाण यांना सुद्धा संधी नांदेड जिल्हाचे माजी पालकमंत्री अशोकराव चव्हाण यांनी दिली होती त्या अनुषंगाने प्रा. रवींद्र पाटील चव्हाण यांना निश्चितच आमदारकीची संधी मिळू शकते असे ही पंडीत पाटील सुगावे यांनी घुंगराळा येथे सांगितले आहे



Post a Comment

0 Comments