दि. नांदेड दक्षिण आ. मोहन अण्णा हंबर्डे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने नाईन ए साईड क्रिकेट संघटनेच्या वतीने नांदेडच्या श्री गुरुगोविदसिंघजी स्टेडियम मैदानावर दि. 4 जुन पासुन क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात झाली. 6 जुन रोजी बक्षीस वितरण व सांगता मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे
संयोजक शेख असलम यांनी सांगितले दि. ४ जुन रोजी सकाळी ९ वाजता क्रीडाधिकारी राजेश्वर मारावार, आ. हंबर्डे यांचे पुत्र राहुल हंबर्डे, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जनार्दन गुपीले, स्टेडियम व्यवस्थापक चवरे, सामाजिक कार्यकर्ते दिगंबर शिंदे, नाईन ए क्रिकेट संघटना राज्य सचीव शेख असलम, राज्य अध्यक्ष राहुल वाघमारे उपस्थित होते
स्पर्धा यशस्वी होण्यासाठी संदीप कदम, रोशन जोगदंड, सय्यद अयाज खादरी, महम्मुद मुबीन,आकाश बनसोडे, मुकुंद डमरे, , शेरखान पठाण, संतोष कांबळे परीश्रम घेत आहेत
यावेळी पंच म. अत्तर, भरत चव्हाण, मोईन अब्दुल रहीम यांनी भूमिका पार पडली ६ जुन रोजी सायंकाळी ५ वाजता अंतीम सामना खेळविला जाईल. तसेच मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण व स्पर्धेची सांगता होणार आहे. या स्पर्धेत विजेते संघांना होणार्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी निवडले जाणार आहे.

0 Comments