Header Ads Widget

खंडोबा मंदिर चोरी प्रकरणात कुंटुर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव पुरी यांना निवेदन वसंत पाटील सुगावे यांची माहिती

       माधव पवार     
नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील खंडोबा मंदिर हे पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असून येथे चोरट्याने शुक्रवारी रात्री ८.३० च्या दरम्यान मंदिरातील दोन दानपेट्या फोडून लाखोंच्या वर ऐवज लंपास केला या प्रकरणी गावकऱ्यांतून तसेच भाविकांतून संतापाची भावना व्यक्त होत आहे

या प्रकरणी वसंत सुगावे पाटील यांनी पोलीस अधीक्षक श्री कृष्णा कोकाटे पोलीस उपअधीक्षक सांगळे यांच्याशी चर्चा करून तात्काळ हा तपास जलदगतीने करण्यात यावा म्हणूनू राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस तथा गावचे उपसरपंच यांच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यानी अशी मागणी केली आहे

त्या अनुषंगाने नांदेडचे पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी श्वान पथक,फॉरेन्सिक विभाग यांना घुंगराळा येथे चोरीच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी पथकाला पाठवले तसेच या संबंधी गावकऱ्यांच्या वतीने सपोनि महादेव पुरी यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले की सदरच्या चोरट्याला लवकरात लवकर जेरबंद करावे ह्या मागणीचे निवेदन देण्यात आले आहे

खंडोबा मंदिरात झालेल्या चोरीचा तपास अधिक गतिमान करून चोरट्याला व चोरट्याने लंपास केलेला मुद्देमाल जप्त करावा अशी अशा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस वसंत पाटील सुगावे  यांच्यासह गावकऱ्यानी अशा व्यक्त केली आहे
        
यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी मातावाड साहेब, सेवानिवृत्त विस्तार अधिकारी दंडेवाड साहेब, से.स.सो संचालक संभाजीराव तुरटवाड, शंकरराव यलपलवाड, अच्युतराव पा. ढगे, गोविंदराव पा. शिंदे, से.स.सो. चे संचालक माधवराव पा. ढगे,  से.स.सो. चे व्हाईस चेअरमन श्यामराव यमलवाड, शालेय शिक्षण समिती अध्यक्ष माधव पा. ढगे, से.स.सो. चे संचालक चंद्रप्रकाश पा. ढगे, पुजारी प्रमोद कुलकर्णी महाराज आदी यावेळी उपस्थित होते

यावेळी सुभाष सावकार पतेवार, मा. ग्रा.पं. सदस्य गंगाधर पा. ढगे, परबता हणमंते गुरुजी, मारोतराव दंडेवाड, बंदेनवाज शेख, सलीम शेख, इरवन्त यमलवाड, शिवराज पा. ढगे, व्यंकट यलपलवाड, साईनाथ पा. सुगावे, विलास पा. सुगावे, दत्ता महाराज, राजेश पा. ढगे, शंतनू पा. ढगे, योगेश पा. ढगे आदी उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments