Header Ads Widget

भाजपा पक्षाने माझ्यावर मांजरम गट प्रमुख म्हणून जबाबदारी टाकली त्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही - श्रीहरी देशमुख यांची प्रतिक्रिया !!

        माधव पवार 
सन २०२४ मध्ये होणाऱ्या लोकसभेच्या व विधानसभेच्या आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकीच्या संदर्भात नायगाव तालुक्यातील नरंगल येथील रहिवासी असलेले श्रीहरी देशमुख यांची नुकतीच भाजपा पक्षाच्या माध्यमातून मांजरम जिल्हा परिषद गटाचे गट प्रमुख म्हणून निवड करण्यात आली आहे

भाजपा पक्ष श्रेष्ठीने माझ्यावर टाकलेल्या जबाबदारीला कसल्याच प्रकारच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया देशमुख यांनी दिली आहे

नायागांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार स्व. बापूसाहेब देशमुख यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये काम करीत असताना आमच्या नेत्यांनी असा विश्वास माझ्यावर टाकला होता

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विश्वासाला श्रीहरी देशमुख यांच्या कडून धक्का बसला नव्हता त्या प्रमाणे भाजपा पक्षात काम करीत असताना पक्षांनी माझ्यावर कोणती ही जबाबदारी टाकली असली तरी देशमुख यांच्या कडून तडा बसणार नाही यांची ग्वाही नायागांव फास्ट न्यूजशी बोलताना दिली आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार राजेश पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असताना आमदाराचे शब्द पाळूनच भाजपा पक्षात काम करण्यासाठी मी प्रयत्नशिल असल्याचे मांजरम गटाचे गट प्रमुख श्रीहरी देशमुख यांचे मत असून पक्षानी माझ्यावर टाकलेला विश्वास पूर्ण पणे करणार असून त्या विश्वासाला कदापि तडा जाऊ देणार असा विश्वास देशमुख यांनी व्यक्त केला आहे 


Post a Comment

0 Comments