माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थित जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग संघटक पदी दिगांबर गंगासागरे यांची निवड करण्यात आली आहे
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या विशेष उपस्थिती मध्ये नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले व अनेक दिवसापासून काँग्रेस पक्षात काम करणारे दिगंबर माणिकराव गंगासागरे यांची दिनांक १२ जुन २०२३ रोजी नांदेड येथे जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग संघटक पदी निवड करण्यात आली असल्यामुळे त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहेत
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेले दिगंबर माणिकराव गंगासागरे यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत सन २०२४ मध्ये होऊ घातलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षांच्या माध्यमातून आवडी निवडीच्या कार्यकर्त्यांचे पद घोषित करण्यात येत आहेत
नायगाव तालुक्यातील घुंगराळ्याचे दिगंबर माणिकराव गंगासागरे यांची जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभाग संघटक म्हणून निवड करण्यात आली या निवडीचे सर्वत्र अभिनंदन व त्यांच्या भावी कार्यासाठी विविध क्षेत्रातून अभिनंदनचा वर्षाव करण्यात येत आहे
लोकसभेच्या व विधानसभेच्या निवडणुका येणाऱ्या काळातील या सहजरीत्या जिंकता यावे म्हणून माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या माध्यमातून सदरच्या नियुक्ती करण्यात येत आहेत
काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बांधणी व पक्षांचा जनाधार वाढविण्याच्या आपल्या कार्याची दखल घेऊन जिल्हा काँग्रेस कमिटी कडून आलेल्या प्रस्तावानुसार आपली नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाच्या संघटक पदी निवड करण्यात आली आहे
राज्याचे माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोकराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली सिद्धार्थ हत्तिअंबिरें प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी गोविंदराव शिंदे नागिलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करून पक्षाची ध्येय धोरणे जनमानसात रुजून संघटना वाढीस बळ निर्माण होईल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते प्राचार्य मनोहर पवार यांनी व्यक्त केला आहे

0 Comments