Header Ads Widget

बरबडा ते वजीरगाव पुलासाठी प्रशासकीय अडचणीमुळे गुत्तेदार मजबुर सहा महिन्यात पूर्ण करतो म्हणाऱ्या गुत्तेदारानी लावले तीन वर्ष तरी काम अर्धवटच

        माधव पवार
नायगाव विधानसभा मतदार संघाचे तत्कालीन आमदार वसंतराव चव्हाण यांच्या हस्ते गेल्या तीन वर्षाखाली गोदावरी
पाटबंधारे विभाग नांदेड यांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेल्या बरबडा ते वजीरगाव रस्त्या वरील पुलाचे उद्घाटन करण्यात आले होते

प्रशासन व गुत्तेदारानी कोरोना महामारीच्या नावाखाली जवळ पास दीड ते पावणे दोन वर्ष काम बंद ठेवले होते सदरचे काम पूर्ण करण्यासाठी गुत्तेदराने आपल्या भाषणातून सहा महिन्याचा अल्टिमेटम दिला होता परंतु अद्याप काम पूर्ण झाले नसल्यामुळे या भागातील जनतेला या पुलासाठी एका वर्षाची प्रतीक्षा करावी लागणार आहे
नायगाव तालुक्यातील बरबडा नगरीचे तत्कालीन माजी सरपंच बालाजी मदेवाड यांनी सदरच्या पुलाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता माजी आमदार वसंतराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली सदरचा कार्यक्रम मोठया थाटात पार पडला होता याच कार्यक्रमात बोलताना चव्हाण म्हणाले होते

माजी आमदार वसंतराव चव्हाण यांनी जनतेच्या सोयी सुविधासाठी सदरचा पूल तात्काळ बांधण्यात यावा अशा सूचना गुत्तेदारासह प्रशासनाला दिल्या होत्या 

वजीरगाव ते बरबडा या सदरच्या पुलाचे काम सध्याच्या परिस्थिती मध्ये गतिमान चालू असले तरी एका वर्षाची प्रतीक्षा या पुलाना पूर्ण होण्यासाठी लागणार असल्यामुळे मागील काही वर्षात प्रशासकीय अडचणी गुतेदाराला निर्माण झाल्यामुळे सदरचे गुत्तेदार हे महागाईच्या भडक्यात  गुत्तेदार मजबूर झाले असल्याची चर्चा आहे 

बरबडा ते वजीरगाव या ओढ्याला दरवर्षी बळेगाव बंधाऱ्याच्या बॅक वॉटरच्या पाण्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना येण्या व जाण्यासाठी जीव धोक्यात घालून सदरच्या बॅक वॉटर च्या पाण्यात पोहत जावे लागते 


Post a Comment

0 Comments