माधव पवार
नायगाव तालुक्यातील मौजे शांती निकेतन विद्यालयाचा गेल्या अनेक वर्षा पासून अपेक्षा पेक्षा ही जास्त लागत असल्यामुळे यंदा ही इयत्ता दहावीचा निकाल दिनांक २ जुन २०२३ रोजी लागलेल्या निकालात रुई बु शांती निकेतन ९८ टक्के निकालाची परंपरा कायम विद्यालयाने ठेवली आहे
विद्यालयातील विद्यार्थीनी मोठे यश मिळवून दिल्याने माजी मंत्री मा. खासदार स्व. गंगाधरराव देशमुख कुंटूर यांचे पुत्र राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख यांनी शिक्षकासह विध्यार्थीचे अभिनंदन केले आहे
शाळेतून प्रथम संध्या सुधाकर पांडे हिला ८७.२० टक्के व व्दितीय नागेश पवार ८७ टक्के तर सुप्रिया विठ्ठल कवळे हिला ८५. ८० टक्के असून एकूण विध्यार्थी ४० पैकीं पास ३९ विध्यार्थी उत्तीर्ण आणि ७५ टक्केच्या वर ११ विध्यार्थी विशेष प्राविण्य व फस्ट क्लास १९ आणि व्दितीय ०९ विध्यार्थी सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे व पालकांचे खुप खुप अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष राजेश देशमुख कुंटुरकर सचिव भाऊसाहेब देशमुख गोरठेकर शाळेचे मुख्याध्यापक बन्नाळीकर व सर्व स्टाफच्या वतीने अभिनंदन करण्यात येत आहे
तालुक्यातील शांती निकेतन विद्यालय रुई बु येथील शाळेतील एकूण विध्यार्थी इयत्ता दहावीच्या परिक्षेला बसले होते त्या पैकी विध्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत तर विशेष प्रविण्यासह उत्तीर्ण झाले असल्यामुळे शाळेचे मुख्याध्यापक बन्नाळीकर यांच्या कार्यकाळात शिक्षणाचा दर्जा सुधारल्यामुळे शाळेत विध्यार्थीची संख्या मोठ्या प्रमाणात आहे
शांती निकेतन विद्यालयाच्या मुख्याध्यापकासह शिक्षक वर्ग विध्यार्थीच्या शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी प्रयत्न करीत आहेत शांती निकेतन विद्यालय रुई येथील इयत्ता दहावीचा निकाल ९८ टक्के मुख्याध्यापक बन्नाळीकर व नितेवाड यांनी माहिती दिली आहे

0 Comments