Header Ads Widget

घुंगराळ्याचा रहिवासी असलेला अभिनेता प्रभाकर महादलिंग अप्पा मठपती यांचा टीडीएम चित्रपट महाराष्ट्रात प्रदर्शित होणार !!

        
         माधव पवार
नांदेड जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील मौजे घुंगराळा येथील सर्व गावकऱ्यांचे दैवत असलेले खंडोबा रायाच्या आशीर्वादामुळे येथील रहिवासी असलेला महादलिंग वीरभद्र मठपती यांचा मुलगा प्रभाकर महादलिंग मठपती हा चित्रपट सृष्टी मध्ये घुंगराळा नगरीचे नाव लौकिक करण्यासाठी टी डी एम मराठी चित्रपटांचा अभिनेता होऊन गावची शान वाढविला आहे
घुंगराळा येथील अभिनेता प्रभाकर मठपती यांचा टीडीएम मराठी चित्रपट हा संपूर्ण महाराष्ट्रात दिनांक ९ जून २०२३ रोजी रसिकांच्या सेवेत प्रदर्शित होणार आहे

जिल्ह्याच्या नायगाव तालुक्यातील घुंगराळ्याचा रहिवासी असलेला हा अभिनेता हा चित्रपट सृष्टीची मोठया प्रमाणात आवड असल्यामुळे त्यांच्या स्वतःच्या अंगातील कला चित्रपट सृष्टीत दाखविली पाहिजे ह्या डोळस विचाराने घुंगराळा येथील अभिनेता प्रभाकर महादलींग अप्पा मठपती मोठ्या मेहनतीने चित्रपट सृष्टीचा मार्ग स्वीकारल्यामुळे समस्त घुंगराळा नगरीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक स्वागत व अभिनंदन केले जात आहे तालुक्यातील घुंगराळा येथील रहिवासी असलेला हा उत्कृष्ट अभिनेता प्रभाकर महादलींग आप्पा मठपती यांचे इयत्ता दहावी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद हायस्कूल घुंगराळा येथे झाल्याच्या नंतर पुढील आयुष्यातील वाटचालीसाठी त्यांच्या मामाच्या गावी म्हणजे चुडंगी तालुका देगलूर येथे गेला आहे 

मामाच्या गावातून पुणे येथे जाऊन पि एच डी करून मराठी चित्रपटात सामील झाला व टिडीएम चित्रपट काढल्यामुळे तो प्रदर्शित होत असल्याने त्यांचे काका शंकर मठपती शिवाजी मठपती उदयभानू ( स्वामी मठपती ) यांचा तो अभिनेता पुतण्या असून कोतुकास्पद कार्यामुळे घुंगराळा नगरीच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन करण्यात येत आहे


Post a Comment

0 Comments