Header Ads Widget

नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या विशेष उपस्थितीत बी एल ओ आणि सुपरवायझर यांचे प्रशिक्षण संपन्न !!

       माधव पवार
नायगावच्या कर्तव्यदक्ष नूतन महिला तहलदार मंजुषाताई भगत यांच्या विशेष उपस्थितीत तहसील  कार्यालयात दिनांक २७ जुन २०२३ रोजी बी एल ओ  तसेच सुपरवायझर यांची विशेष बैठक घेऊन या बैठकी मध्ये बी एल ओ आणि सुपरवायझर यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे

भारत निवडणूक आयोगाने दिनांक १ जानेवारी २०२४ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अंतिमरित्या प्रसिद्ध करण्याबाबतचा कार्यक्रम घोषित केला असल्यामुळे नायगावच्या तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी विशेष बैठकीचे आयोजन केले होते

तहसीलदार मंजुषाताई भगत यांच्या तहसील कार्यालयात त्या अनुषंगाने अचूक व परिपूर्ण मतदार याद्या तयार करण्यासाठी अनुषंगिक कार्याच्या अनुषंगाने कामाची गती वाढावी यासाठी नवीन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी बी एल ओ आणि सुपरवायझर यांचे नियुक्ती बाबत निर्देश दिले आहे

 या अनुषंगाने विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपरोक्त कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अधिकचे मनुष्यबळ लागणार असल्यामुळे सदरच्या बैठकीचे तहसीलदार मंजुषाताई भगत यांनी बैठकीचे आयोजन केले होते

सदरच्या बैठकीदरम्यान कर्मचाऱ्यांची मतदान केंद्रीय अधिकारी बी एल ओ आणि सुपरवायझर म्हणून नेमणूक करण्यात आले असल्याची माहिती आहे

नायगाव विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्या तयार करण्यासाठी इतर अनुषंगिक कार्याच्या अनुषंगाने आवश्यक माहिती नवनियुक्त मतदान केंद्रस्तरीय अधिकारी गेलो यांचे प्रशिक्षण दिनांक २७ जुन २०२३ रोजी तहसील कार्यालय नायगाव येथे दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान सदरच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये कामाबाबतची इथे वृत्त माहिती या प्रशिक्षण सत्रात घेण्यात आली आहे

तहसीलदाराने आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमास न चुकता वेळेवर उपस्थित राहून सुदरील कामास त्वरित सुरुवात करावी सदरेल कामात टाळाटाळ केल्यास आपल्या हिरोचे लोक प्रतिनिधित्व अधिनियम १९५०चे कलम ३२ अनुसार कारवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी असे ही तहसीलदाराने सुचित केले होते

तहसीलदाराच्या उपस्थितीत बी एल ओ आणि सुपरवायझर यांची विशेष बैठक संपन्न करण्यात आला आहे 

Post a Comment

0 Comments