Header Ads Widget

" मुख्यमंत्री साहेब " भूमिपूजन करून दहा महिने झाले पूल कधी बांधणार : शिवसेना जिल्हाप्रमुख माधव पावडे यांचा सवाल -

              माधव पवार
नांदेड : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः येऊन नांदेड उत्तर मधील पासदगाव येथील आसना नदीवर पूल उभारणीच्या कामाचे भूमिपूजन केले होते. भूमिपूजन करून दहा महिने लोटले आहेत

अद्यापही पुल उभारणीच्या कामाला सुरुवात झाली नाही मग पुल कधी उभारणार असा सवाल उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माधव पावडे यांनी उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येत्या रविवारी नांदेडमध्ये शासन आपल्या दारी अभियानात लाभार्थ्यांना लाभ देण्यासाठी  येणार आहेत असे सांगत मिंदे सेनेकडून लोकांची दिशाभूल केली जात आहे. वास्तविक गद्दारी करून सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री शिंदेंनी नांदेडकरांच्या ही तोंडाला आश्वासनाची पाणे पुसली आहेत

मोठा गाजावाजा करून दहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना नांदेडमध्ये आणण्यासाठी गद्दार आमदाराने घाईघाईत पासदगाव येथील आसना नदीवर मंजूर पुलाच्या बांधकामाचा भूमिपूजन कार्यक्रम घेतला. ८ आगस्ट २०२२ रोजी या कामाचे भूमिपूजन झाले खरे पण दहा महिन्याचा कालावधी लोटला असतानाही पुलाच्या कामाला अद्यापही सुरुवात झाली नाही.

कोट्यवधी रुपयांच्या विकास कामाचे भूमिपूजन केले खरे पण काम प्रत्यक्ष कधी सुरू करणार असा खडा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नांदेडमध्ये येण्यापूर्वी नांदेडकरांना प्रत्यक्ष कामाला सुरुवात करून दाखवा असे खुले आव्हानच पावडे यांनी दिले आहे. दरम्यान नांदेड पूर्णा या रोडच्या कामाचे भूमिपूजनही मुख्यमंत्र्यांचे हस्ते करण्यात आले होते.

शिवाय नांदेड शहरात जी विकासाची कामे मंजूर करण्यात आली ती सगळीच कामे दर्जाहिन होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभाग मनमानी चालवत आहे.  या कामात मोठा भ्रष्टाचार होत असून सत्ताधारी मलिदा लटत  असल्याचा आरोप आहे माधव पावडे यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments