Header Ads Widget

नायगाव तहसील जवळ ३० मे रोजी कार आडवून लूटमारी करणाऱ्या तीन आरोपीला एलसीबीने केले जेरबंद

        माधव पवार
पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या आदेशानुसार नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गावर दिनांक ३० मे २०२३ रोजी कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या तहसील कार्यलयासमोर कार आडवून तीन आज्ञात आरोपीनी एकूण रक्कम ११ लाख ६२ हजार ३७३ रुपयाचा दरोडा टाकला होता त्या प्रकरणातील तीन आरोपीला एलसीबीने केले आहे
नायगाव तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत टाकलेल्या दरोड्यातील आरोपीला जेरबंद करण्यासाठी एलसीबीसह कुंटूर पोलीसाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले होते

नांदेड ते हैद्राबाद राज्य महामार्गांवर असलेल्या तहसील कार्यालयाच्या पाटी जवळ दिनांक ३० मे २०२३ रोजी संध्याकाळी ठीक ९ ते साडे नऊच्या दरम्यान नायगाव कडून खाद्य तेलाची वसुली करून नांदेडकडे जाणाऱ्या कारवर दरोडा टाकण्यात आला होता

दरोडा प्रकरणातील आरोपी नायगाव मच्छी मार्केट येथे असल्याची माहिती मिळाल्या वरून वरिष्ठ अधिकाऱ्यास कळवून एलसीबीच्या पथकानी आरोपी लक्ष्मण बाबुराव वय २५ वर्ष व्यवसाय बेकार यांना ताब्यात घेण्यात आले त्यास विचार पूस केली आहे

त्यांच्या कडून मिळालेल्या माहिती नुसार बालाजी बाबुराव जाधव राहणार नायगाव गजानन व्यंकट पीटलेवाड राहणार शिवाजी नगर नांदेड प्रवेशकुमार उर्फ बबलू परशुराम गायकवाड व्यवसाय बेकार राहणार देगांव तालुका नायागांव राध्येश्याम पंजाबराव भालेराव सखोजी नगर राहणार नांदेड आणि एक अल्प वयीन आरोपी असून सदरचा गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळते आहे 

कुंटूर पोलीस ठाण्याच्या हदीतील दरोडा प्रकारणातील कार क्रमांक एम एच २६ बी एक्स ३८४९ ला रस्त्यावर कट का मारली म्हणून वाद घालीत दरोडा टाकणाऱ्या तीन आज्ञात दरोडेखोराच्या विरोधात कुंटूर पोलीस ठाण्यात दिनांक ३१ मे २०२३ रोजी सकाळी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली होती

तालुक्यातील कुंटूर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत टाकलेल्या दरोड्या प्रकरणी या घटनेतील फिर्यादी युवराज श्रीपतराव निवळे यांनी कुंटूर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारी वरून आज्ञात आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता 


Post a Comment

0 Comments