लोकप्रिय खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशी निमित्त यावर्षीही आळंदी- पंढरपूर पायी दिंडीत असलेल्या वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी लोणद मुक्कामी असलेल्या पासदगावच्या दिंडीतील वारकऱ्यांचे दर्शन घेऊन विचारपूस केली.
गेल्या अनेक दशकापासून खा.प्रतापराव पाटील चिखलीकर हे आळंदी- पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. नुकतेच खा. चिखलीकर यांनी पंढरपूर येथे विठ्ठल- रुक्मीई चे दर्शन घेऊन लोणंद येथे मुक्कामी असलेल्या आळंदी- पंढरपूर पायी दिंडीतील वारकऱ्यांच्या तंबूना भेट देऊन दर्शन घेतले आहे
नांदेड शहरातलगत असलेल्या पासदगाव येथील ह.भ.प.अशोक महाराज आळंदीकर यांच्या नेतृत्वाखालील लोणंद मुक्कामी असलेल्या दिंडीला भेट दिली असता खा. चिखलीकर यांचे पासदगावचे माझी चेअरमन चांदबाराव जाधव, अशोक महाराज आळंदीकर यांनी खा. चिखलीकर यांचा सत्कार करून येथोचीत स्वागत केले.
यावेळी पायी दिंडीतील वारकरी कैलासराव सूर्यवंशी, शंकर जाधव, मारोतराव जाधव, बाळू माऊली जाधव, गणेश माऊली, ग्यानोजीराव जाधव, नवनाथ जाधव, गोविंदराव जाधव, माधव जाधव, बापूराव जाधव यांच्यासह पासदगाव दिंडीतील वारकऱी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments