Header Ads Widget

सुरज पाटील शिंदे हुस्सेकर यांची एनएसयुआयच्या जिल्हा उपाध्यक्षपदी निवड

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे - 
काँग्रेस पक्षात सक्रिय असलेले सुरज पाटील शिंदे हुस्सेकर यांची एनएसयुआयच्या जिल्हा उपाध्यक्षपदी नुकतीच निवड करण्यात आली आहे. एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पा क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्हा एनएसयुआयची कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे

व एका भव्य सोहळ्यात राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सन्मान करून त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे 
   
यावेळी काँग्रेस पक्षात विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी कायम आक्रमक भूमिका घेत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविण्यात ज्यांचा कायमच महत्त्वाचा सहभाग राहिलेला आहे व ज्यांनी कोरोना काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अनेक प्रकारे मदत करत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कायम तत्पर राहिलेले व यापूर्वी नायगाव तालुका एनएसयुआयच्या तालुका अध्यक्ष पदाची धुरा अतिशय समर्थपणे सांभाळलेले सुरज पाटील शिंदे हुस्सेकर यांची माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते सत्कार करून जिल्हाउपाध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

सुरज पाटील शिंदे हे पक्षाचे निष्ठावंत आणि विश्वासू मानले जातात, त्यामुळे त्यांच्यावर टाकलेली ही जबाबदारी सार्थ असल्याचे ते सिद्ध करतील, तथा अशा वैचारिक तरुणांची निवड ही पक्षासाठीही हितकारक आहे', असे मत बोलताना अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केले.

नायगाव मतदारसंघाचे लोकनेते माजी आमदार वसंतराव पा चव्हाण व रविंद्र पा चव्हाण यांच्या मार्गदर्शक नेतृत्वात सुरज पाटील यांनी नायगाव तालुक्यात  पक्षवाढ व पक्षसंघटनासाठी परिश्रम घेतले. एनएसयुआयचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष अमेर शेख यांच्या नेतृत्वात गेल्या काही वर्षांत विद्यार्थी काँग्रेसमध्ये उल्लेखनीय काम करत आहेत. 

भव्य सोहळाच्या स्वरूपात पार पडलेल्या या कार्यक्रमात अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री डीपी सावंत, आमदार अमरनाथ राजुरकर, आमदार मोहन अण्णा हंबर्डे, महाराष्ट्रप्रदेश कांग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमीरभाई शेख, जिल्हाध्यक्ष गोविंदराव पाटील शिंदे नागेलीकर, युवक काँग्रेसचे (शहर) जिल्हाध्यक्ष विठ्ठल

पावडे, मा. पंकज पाटील चव्हाण,बापूसाहेब पा. कौडगावकर, मारोतराव कवळे गुरुजी, जिल्हा एनएसयुआयचे अध्यक्ष शशिकांत पाटील  क्षीरसागर यांची उपस्थिती होती.यावेळी उपस्थित मान्यवरांनी निवडीबद्दल सूरज पाटील शिंदे यांचे अभिनंदन केले. विविध स्तरातून सदर निवडीबद्दल सुरज पाटील शिंदे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.

Post a Comment

0 Comments