कॉर्टेवा अग्री सायन्स डाऊ डुपॉंट अग्री सायन्स कंपनी आयोजित सोयाबीन तुर पिकावर चर्चासत्र उद्या दि. ६ जुन २०२३ रोजी सकाळी ठिक ९:०० वाजता , सिद्धेश्वर मंगल कार्यालय,उदगिर रोड देगलुर , येथे आयोजित करण्यात आले आहे. या चर्चासत्रामध्ये सोयाबिन तुर पिकातील तण नियंत्रण आणि पेरणी पासुन काढणी प्रयंत संपुर्ण माहिती देण्यात येणार आहे.
सोयाबिन हे पीक शेतकऱ्यांचा आर्थिक आधारस्तंभ बनतेय,परंतु सोयाबिन पिकतिल तणाच्या नियोजना अभावी शेतकऱ्यांना खूप नुकसान होत आहे. त्यामुळे पहिल्या दिवसापासून तण नियंत्रण आणि वातावरणातील बदलानुसार आर्थिक ताळेबंद घालून सोयाबिन,तुर पेरणीपासून काढणीपर्यंत तांत्रिक चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहे.
सोयाबिन तुर* पिकात येत असलेल्या अडचणी कीड व रोग आणि सध्याचा बदलत्या वातावरणाचा पिकावर होणारा विपरीत परिणाम या समस्यावर या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे,
यामध्ये , श्री. कपिल चव्हाण सर,व शरद पवळे सर यांचे मार्गदर्शन लाभणार होणार असून या चर्चासत्रामध्ये सोयाबिन तुर पिका बद्दल संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे तसेच कीड - रोग बद्दल माहिती सांगण्यात येणार आहे.
सदर कार्यक्रम हा विनामूल्य राहील या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे *सोयाबिन तुर पिकावरिल संपूर्ण माहिती पडद्यावर दाखवण्यात येईल, तसेच उपस्थित शेतकरी बांधवांच्या सर्व अडचणी चर्चासत्रात सोडवण्यात येतील. परिसरातील सर्व शेतकरी बांधवांनी उपस्थित रहावे कॉर्टेवा अग्री सायन्स डाऊ डुपोँड़ अग्री सायन्स कंपनी यांच्यावतीने आयोजन करण्यात आले आहे.

0 Comments