Header Ads Widget

मुख्यमंत्र्याच्या शासन आपल्या दारी मोहिमेचा ग्रामीण भागात फज्जा बीएसएनएलचे ब्रॉड बँडचे कनेक्शन चार महिन्या पासून मिळेना

       माधव पवार
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रात ‘शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येत असले तरी समाजातील सर्व तळागाळातील घटकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळत नसल्याचे दिसून येत असून नायगाव तालुक्यातील घुंगराळा येथे स्वरा कॉम्प्युटरला बीएसएनएलचे ब्रॉड बँडचे कनेक्शन गेल्या चार महिन्या पासून मिळत नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे

नायगाव तालुक्यातील घुंगराळा स्वरा कॉम्प्युटरला दिनांक ८ मार्च २०२३ रोजी चार हजार चारशे रुपये कोटेशन भरलेले असताना सुद्धा चार महिन्या पासून कलेक्शन मिळत नसल्यामुळे शासन आपल्या दारी ह्या योजनेचा चांगलाच ग्रामीण फज्जा उडाला असल्याचे वास्तव चित्र पाहव्यास मिळत असून या मोहिमेच्या माध्यमातून गोरगरीब जनतेला त्यांचा लाभ मिळावा म्हणून प्रयत्न केले जात असले तरी सदरची अंमलबजावणी नीट नेटकी होत नसल्याचे दिसून येत आहे

तालुक्यातील घुंगराळा येथील स्वरा कोम्पुटर असून सदरचे कोम्पुटर शिवकुमार हंगरगे गजानन वाघमारे चालवितात परंतु त्यांना अध्यप कनेक्शन देण्यात आले नसल्यामुळे संताप व्यक्त केला जात असून गोरगरीब विध्यार्थाना संगणकाचा परिपूर्ण लाभ मिळावा सदर कोम्पुटरची सेवा देण्यासाठी टाकण्यात आली परंतु शासन आपल्या दारी या मोहिमेच्या अंतर्गत गोरगरीब जनतेला न्याय मिळेल असे वाटले होते परंतु गेल्या चार महिन्यापासून कलेक्शन दिले नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या संगणक शिक्षणावर मोठे नुकसान होत असल्याचे कॉम्प्युटर कर्त्यांची म्हणणे आहे 


Post a Comment

0 Comments