Header Ads Widget

भाजपा पक्षश्रेष्ठीने माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील होटाळकराना जिल्हाध्यक्ष पदाची संधी द्यावी भाजपा कार्यकर्त्यांची मागणी -

        माधव पवार
भाजपा पक्षाच्या माध्यमातून व विद्यमान खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेत्रत्वाखाली नांदेड जिल्ह्याचे नेतृत्व करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा माजी शिक्षण सभापती व नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती शिवराज पाटील होटाळकर हे सक्षम असल्यामुळे पक्ष श्रेष्ठीने जिल्हा अध्यक्ष पदाची संधी द्यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यांनी केली आहे

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस शिवराज पाटील होटाळकर यांनी थंड विचाराने विचार करून भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या महिन्यात पार पडलेल्या नायागांव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकित काँग्रेस सोबत युती करून एकूण सहा उमेदवार बिन विरोध काढून बाजार समितीवर सत्ता स्थापन करण्यासाठी दावा केला आहे

जिल्ह्यातील नायगाव कृषी उत्पन्न बाजार समितीवर उपसभापती म्हणून माजी शिक्षण सभापती शिवराज पाटील विराजमान झाले असल्यामुळे नांदेड जिल्हाचे ही नेतृत्व करण्यासाठी भाजपा पक्षांनी जिल्हा अध्यक्ष म्हणूण संधी खासदार प्रताप पाटील चिखलीकर देतील अशी अपेक्षा भाजपा कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे

भाजपाच्या जिल्हा अध्यक्ष पदासाठी मा. शिवराज पाटील यांचे नाव प्रमुख्याने चर्चेत दावेदार असल्यामुळे पक्षानी संधी दिल्यास जिल्हाध्यक्ष होऊ शकतात अशी अपेक्षा ही भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अशा व्यक्त करीत पक्ष श्रेष्ठीने होटाळकर यांना जिल्ह्याचे नेतृव करण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी भाजपा कार्यकर्त्यातुन जोर धरित आहे 

Post a Comment

0 Comments