दीपकनगर तरोडा बुद्रुक येथील श्रीनिकेतन प्राथमिक शाळेत गुरुवार दिनांक १५ जून रोजी दीर्घ सुट्टीनंतर शाळेत येणाऱ्या सर्व विद्यार्थी, पालकांचे स्वागत मुख्याध्यापिका डॉ.सौ.एस.एन.राऊत यांनी गुलाबपुष्प देऊन केल्या.
उन्हाळी दीर्घ सुट्टीनंतर गुरुवारी शाळेची घंटा वाजताच शाळेत विद्यार्थी दाखल होणार म्हणून मुख्याध्यापिका डॉ सौ.राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली होती.शाळेच्या प्रवेशद्वारावर फुगे लावून प्रवेशद्वार सुशोभीत करण्यात आले होते
प्रवेशद्वारा समोर स्वागताची रांगोळी टाकून फुलांच्या पाकळ्याची पाऊल वाट तयार करून विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षक सज्ज झाले होते
विद्यार्थी शाळेच्या प्रवेशद्वारावर येताच शाळेच्या मुख्याध्यापिका डॉ. सौ.एस. एन.राऊत यांनी विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करून शैक्षणिक वर्षाच्या शुभेच्छा दिल्या.
विद्यार्थ्यांचा शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांचा शैक्षणिक स्तर तपासून अध्यापन करावे अशा सूचना शिक्षकांना डॉ. सौ. राऊत यांनी देऊन पालकांनी मुलांना दररोज शाळेत पाठवण्यासाठी प्रोत्साहित करावे असे आवाहनही केले
विद्यार्थ्यांच्या स्वागतानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना मुख्याध्यापिका डॉ.सौ. एस. एन राऊत यांच्या हस्ते मोफत शालेय पाठ्यपुस्तके वाटप करण्यात आली. यावेळी शाळेतील शिक्षक प्रल्हाद आयनेले, अविनाश इंगोले, श्रीधर पवार, सुदर्शन कल्याणकर, बाळकृष्ण राठोड, गतीश मगरे,सौ. सुरेखा मरशिवणे ,बालवाडी शिक्षिका सौ.बुद्धगना गोखले यांच्यासह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Comments