मातोश्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते सोपान नेव्हल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त तरोडा खुर्द मारुती मंदिर प्रांगणात शुक्रवार दिनांक १६ जून रोजी आयोजित महारक्तदान शिबिरात १२५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सोपान नेव्हल पाटील यांना शुभेच्छा दिल्या.
मातोश्री प्रतिष्ठान तर्फे गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक उपक्रमात सातत्याने चर्चेत असलेले सोपान नेव्हल पाटील यांनी स्वतःच्या वाढदिवसानिमित्त महारक्तदान शिबिर आयोजित केले होते.
दिवसभर चाललेल्या महा रक्तदान शिबिरात नितीन तरटे, दिगंबर गाडे पाटील, प्रसाद पाटील पांगरिकर, हरिभाऊ शिंदे, सदबिरशिंग, मारुती शिवराज पाटील,पाटील, देवानंद काटकर, विकास पाटील, प्रसाद पाटील धावंडेकर, अमित गाडे पाटील, महेश पाटील अवचार, जीवन बंडेवाड, आकाश कांबळे, आदमी रक्तदान केले
तर स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडच्या महिला प्रदेशाध्यक्ष रेणुकाताई मोरे, नगरसेवक किशन कल्याणकर, संजय बोराटे, अखिल भारतीय छावा प्रदेशाध्यक्ष पंजाबराव काळे पाटील नगरसेवक दीपक पाटील, गणेश दादा कदम, प्रहार चे शाहू महाराज, सोनू महाराज, आधी राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी सोपान नेव्हल पाटील यांना शुभेच्छा देऊन अभिष्टचिंतन केले.

0 Comments