नायगाव तालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटी येथे दिनांक १७ जुन २०२३ रोजी सभापती बाळासाहेब उर्फ आंबादास धर्माधिकारी बरबडेकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या बैठकित एक महत्वाचा निर्णय घेण्यात आला यावेळी मानधन भत्ता सुद्धा घेतला जाणार नाही निर्णय घेण्यात आला आहे
कुंटूर मार्केट कमिटीला पणन विभागाने सक्षम करण्या विना थेट कीर्ती गोल्ड कंपनीला लायन्स देऊन दिले ते तात्काळ रद्द करुन सदरच्या कंपनीकडे गेल्या १२ वर्षा पासून असले वसुली मार्केट कमीटीला वसूल करुन द्यावे असे कुंटूर मार्केट कमिटीचे सभापती आंबादासराव धर्माधिकारी बरबडेकर यांनी घेतला असून कीर्ती गोल्ड कंपनीने पणन मंडळाचे लायन्स न घेता कुंटूर मार्केट कमीटीचे घ्यावे असा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपसभापती मनोज पाटील मोरे यांनी सांगितले आहे
तालुक्यातील कुंटूर मार्केट कमीटीच्या कार्यक्षेत्रात म्हणजे अंतर्गत एकूण साडे चार एकर जमीन असल्यामुळे या जाग्यात गाळे बांधण्यासाठी शासनाने मोठा निधी उपलब्ध करुन द्यावा त्याच बरोबर या मार्केट कमिटीचे सचिवासह अन्य तीन कर्मचारी सेवा निवृत्त झाले आहेत त्याच बरोबर कुंटूर मार्केट कमिटीसह बरबडा उप मार्केट असल्यामुळे या दोन्ही गाळे बांधण्याचा संकल्प सभापती आंबादासराव धर्माधिकारी व उपसभापती मनोज पाटील मोरे यांनी सदरचा निर्णय घेतला आहे
कुंटूर मार्केट कमिटीतील त्या रिक्त जागा भरण्यासाठी सदरच्या मार्केट कमिटीला परवानगी द्यावी या बाबी संबंधित विभागाचे अधिकारी मान्य नाही केल्यास मार्केट कमिटीच्या विलानिकालाला कुंटूर मार्केटीचा ठाम विरोध राहणार असे सभापती बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले तर उपसभापती मनोज पाटील मोरे यांनी असे सांगितले की शेतकऱ्यांचा पैसा असल्यामुळे हितासाठी वापरला पाहिजे असे मोरे यांनी सांगितले आहे
कुंटूर मार्केट कमिटीच्या बैठकीच्या निर्णयात सदरची मार्केट कमिटी स्वतंत्रपणेच राहील विलीन होणार नाही असे सभापती बाळासाहेब धर्माधिकारी बरबडेकर उपसभापती मनोज रावसाहेब पाटील मोरे टाकळीकर तर संचालक रुपेश देशमुख कुंटूरकर शिवाजीराव बळवंतराव धर्माधिकारी येसाजी देवराव कदम रेशमाजी जाधव हणमंतराव पांडे सौ सुवर्णा जाधव प्रणिता हंबर्डे रमेश इबितवार गोविंद परडे बालाजी कदम माधव कदम दत्तराम आईलवार बालाजी लाव्हाळे बालाजी जाधव गोविंद शेवाळे बालाजी शिनगारे सचिन मोरे यावेळी उपस्थित होते

0 Comments