महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह नायागांव विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून विविध पदे भूषविणाऱ्या नरसी येथील काँग्रेस पक्षाचे नायगाव तालुका अध्यक्ष संभाजी पाटील भिलंबडे यांची नुकतीच नांदेड जिल्हा काँग्रेस कमीटीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
नायगाव तालुक्यातील एकनिष्ठ सक्रिय उच्च विद्या विभूषित व्यक्तीमत्व नायगाव तालुकाध्यक्ष संभाजी पाटील भिलवंडे यांची नांदेड जिल्हा काँग्रेस कमीटीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड झाली असल्यामुळे त्यांना नियुक्तीपत्र मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटीचे उपाध्यक्ष मा.आ.अमरनाथ राजूरकरनांदेड जिल्हा काँग्रेस कमीटीच्या नवनिर्वाचित उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे
सन १९९७ ते २००७ विध्यार्थी काँग्रेस २००७ ते २०११ युवक काँग्रेस नायगाव तालुका अध्यक्ष २०११ ते २०२३ नायगाव तालुका अध्यक्ष व राज्याची वयवृद्ध कलाकार मानधन कमिटी महाराष्ट्र शासन जिल्हा दूरसंचार सलागार समिती सदस्य भारत सरकार असे संभाजी पाटील भिलंवडे यांनी पद सांभाळली आहे
यावेळी आ.ओमप्रकाश पोकर्णा जिल्हाध्यक्ष गोविंदराव नागेलीकर,सभापती संजय देशमुख लहानकर, युवानेते प्रा.रविंद्र पाटील चव्हाण सेवादलाचे जिल्हाध्यक्ष शिवाजीराव धर्माधिकारी, अनुसुचीत जाती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.मनोहर पवार, उपसभापती मनोज पाटील टाकळीकर,काँग्रेसचे जिल्हा सचिव बालाजीराव मद्देवाड, प्रफुल्ल सावंत आदी विशेष मान्यवरांच्या उपस्थितीत देण्यात आले आहे

0 Comments