सध्या पेरणी साठी शेतकऱ्यांची बिया भरणासाठी नायगावच्या बाजारात गर्दी होत असतानाच दिनांक ११ जुन २०२३ रोजी नायगाव तालुक्यातील कोलंबी येथे सोयाबीनचे अंदाजे ५९ लाख रुपयाचे परवाना नसताना पॅकिंग करून बियाणे विक्री साठी जाणारा ट्रुक किंमत ४० लाख रू.असे एकूण ९९ लाख रुपयांचा मुद्देमाल पकडले असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे
सदरचे पकडलेले बियाने चौकशी करण्यासाठी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यानी सोयाबीनचे ट्रूक रविवारी नायगाव पोलिसांच्या हवाली केले आहे
सोमवारी ता.कृषी अधिकारी सुनील पाटील वरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सायंकाळी नायगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नायगाव येथे नव्यानेच रुजू झालेले ता कृषी अधिकारी एस. डी .वरपडे यांनी बाबासाहेब गिरी ,पी बी गुंडे व इरफान शेख यांच्या पथकाला सोबत घेऊन सुट्टीच्या दिवशी रविवारी सकाळी साडे आकरा वाजता दरेंगाव कोलंबी रस्त्यावर असलेल्या पंडित कचवे यांच्या शेड समोर बोगस बियाणांचा ट्रुक पकडला.
सदरचा पकडण्यात आलेला ट्रक क्रमांक एम पी ४८ एच ३५७५ नायगाव पोलीसाच्या ताब्यात रविवारीच देण्यात आला होता.चौकशी करून सोमवार दि.१२ जून रोजी सायंकाळी वरपडे यांनी दिलेल्या चार पानी फिर्यादी वरून आरोपी पंडित भागोजी कचवे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे
यात यात गोदावरी सिड्स बायोटेक कंपनी ला पॅकिंग व विक्री परवाना नसताना बियाणे विक्री साठी एकूण ६९०पोते ज्याची किंमत ५९,१५,३०० रु.हा पकडला,शिवाय ट्रुक किंमत ४० लाख रु.असे एकूण ९९१५३०० रु.चा माल जप्त केला.
आरोपी पंडित भागोजी कचवे रा कोलंबी यांच्या विरुद्ध गु.र.न. ७७/२३ बियाणे कायदा१९६६चे कलम ७ ड १९ ,बियाणे निर्देश १९८३ खंड७,८,अ,९,१८ (२),व अत्यावश्यक वस्तू कायदा १९५५ चे कलम ३(१)७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीस अटक झालेली नाही.या घटनेचा अधिक तपास
पोलीस निरीक्षक जयप्रकाश के. गुट्टे हे करीत आहेत.दरम्यान पोलीस उपअधीक्षक संपते यांनी नायगाव पोलीस ठाणे येथे भेट दिली व चॉकशी केली.या विषयी नागिरीकात उलट सुलट चर्चा होत आहे.

0 Comments