राज्यातले राजकारणासह नांदेड जिल्ह्याच्या नायगाव विधानसभा मतदार संघातील विकास म्हणजे सत्ताधाऱ्याकडून विकासाचे कागदी घोडे नाचवीत असल्याचे मत माजी आमदार तथा नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष वसंतराव चव्हाण यांचे पुत्र भावी आमदार प्रा. रवींद्र पाटील चव्हाण व्यक्त केले आहे
नायगाव विधानसभा मतदार संघाच्या विकासाच्या बाबतीत बोलताना प्रा. रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले की
सत्ताधाऱ्या कडून केवळ विकासकांचे कागदी घोडे नाचवित असल्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासाचा खेळखंडोबा झाला असल्याचे मत ही त्यांनी व्यक्त केले आहे
सत्ताधारी आमदारांनी नायगाव विधानसभा मतदार संघाचा विकास करण्यासाठी नुसत्या निधीच्या घोषणा केल्या परंतु सदरच्या निधीचा उपयोग उन्हाळा संपला तरी त्या निधीचे काम कुठेच पहावयास मिळत नसल्याचेही प्रा. रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहे
नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या सत्ताधाऱ्या कडून जनतेला विकास अपेक्षित होता परंतु तसे झाले नाही केवळ कोठ्यावधी रुपयाचा निधी आणल्याचे मात्र सत्ताधारी आमदाराकडून सांगण्यात आले असले तरी या मतदारसंघाची विकासाविना वाट लागल्याचे स्पष्ट चित्र दिस असल्याचे माजी आमदार पुत्र रवींद्र पाटील चव्हाण म्हणाले आहे
सदरचा आलेला निधी म्हणजे बोलाचा भात आणि बोलाची कळीच असा ही प्रश्न माजी आमदार पुत्र भावी आमदार रवींद्र पाटील चव्हाण यांनी उपस्थित केला आहे

0 Comments