Header Ads Widget

माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांचा गेल्या पन्नास वर्षाखाली गुलाबाच्या फुलात जन्म झाला - खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांचे प्रतिपादन

       
        माधव पवार
काँग्रेस पक्षाच्या कार्यकाळा देशात गेल्या पन्नास वर्षाचा इतिहास पाहिला तर विकासाचा बट्ट्याबोळ झाला  या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तुलनेत पाहिले तर नऊ वर्षाच्या काळात विकासाच्या माध्यमातून मोठी प्रगती झाली असल्याचे सांगत नांदेड जिल्ह्याचे भाजपाचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की अशोकरावाचा जन्म गेल्या ५० वर्षाखाली गुलाबांच्या फुलात झाला असल्याचे प्रतिपादन केले आहे
कुंटूर येथे आयोजित करण्यात आलेल्या सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष भारतीय जनता पार्टी महा जन संपर्क अभियान डब्बा पार्टीचे आयोजन मा.राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष भारतीय जनता पार्टी महा जन संपर्क अभियान डब्बा पार्टीचे आयोजन  केले होते
या कार्क्रमात बोलताना खासदार प्रताप पाटील चिखलीकर म्हणाले की अशोकरावांनी गेल्या पन्नास वर्षाच्या काळात नांदेड जिल्ह्यामध्ये एक किलोमीटर हवे रस्ता कुठे बनविला का ? असा प्रश्न करीत माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांचा मी आदर करतो परंतु वयाच्या मानानुसार खतगावकरांचे भान जात असल्याचे चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या कुंटूर येथील कार्यक्रमात बोलून दाखविले आहे 

गेल्या पन्नास वर्षांच्या काळात पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची कोणीही काळजी घेतली नव्हती परंतु वारकऱ्यांच्या पायाला उन्हाचे चटके बसू नये म्हणून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारकऱ्यांसाठी गवताचा रस्ता बनविण्याचा संकल्प केला असल्याचे प्रताप चिखलीकर यांनी आयोजित केलेल्या डब्बा पार्टीच्या कार्यक्रमात बोलत होते
सदरच्या कार्यक्रमात पुढे बोलताना खासदार प्रताप पाटील म्हणाले की सदरची डब्बा पार्टी म्हणजे एकमेकाचे विचार घेणे व त्यामधून चर्चा  करण्यासाठी सदरच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे ही खासदार प्रताप पाटील यांनी सांगितले आहे 

मा.राजेश देशमुख कुंटूरकर यांच्या नेतृत्वाखाली सेवा सुशासन आणि गरीब कल्याण वर्ष भारतीय जनता पार्टी महा जन संपर्क अभियान डब्बा पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे 
सदरच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर होते तर विचार मंचावर माजी आमदार सुभाष साबणे कुंटूर मार्केट कमिटीचे सभापती बाळासाहेब उर्फ आंबादासराव धर्माधिकारी भारतीय जनता पार्टीचे भाजपा कार्यकारणी सदस्य बालाजी बच्चेवार यावेळी उपस्थित होते

भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस श्रावण पाटील भिलंवडे, माणिकराव लोहगावे कुंटूर मार्केट कमिटीचे संचालक रुपेश देशमुख माजी जिल्हा परिषद सदस्य सूर्याजी पाटील चाडकर रुई बुचे सरपंच प्रतिनिधी निलेश देशमुख संदीप पावडे सुधाकर देशमुख उमरी देविदास बोमनाळे सूर्यकांत पाटील कल्याण डॉ अमोल ढगे नायगाव पंचायत समितीचे माजी उपसभापती गजानन पाटील जुन्ने शिवाजी पाटील कुंटूरकर धनराज शिरोळे शेक अयुब भाई आदी यावेळी उपस्थित होते

Post a Comment

0 Comments