नायगाव तालुक्यातील मौजे रुई बु येथील सिद्ध श्रीक्षेत्र पंढरपूर येथून संत हरिओम बाबा यांच्या नेतृत्वाखाली दिनांक २९ जुन २०२३ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या दरम्यान सदरच्या भव्य दिंडीचे आयोजन करण्यात आले होतेया भव्य दिंडीत महिला भक्त मंडळी व पुरुष भक्त मांडळी मोठया संख्येने उपस्थित होते यावेळी ज्ञानेबा माऊली तुकाराम म्हणत भक्तानी पायी दिंडी काढून शुभ संदेश दिला आहे
तालुक्यातील श्रीक्षेत्र सिद्ध सिद्धेशर पंढरपूर मौजे रुई बु येथील संत हरिओम बाबा यांच्यामुळे या देवस्थानाचे मोठे पवित्र स्थान निर्माण झाले असल्यामुळे या ठिकाणी मोठ मोठाले भंडारे सप्तहा कीर्तन भजन अखंड हरीनाम शिवरात्रीला जल्लोष केला जात आहे
रुई बु या ठिकाणी जिल्ह्यातले नव्हे तर बाहेर जिल्यातील व महाराष्ट्रातील नामांकित कीर्तनकार या ठिकाणी कीर्तन करण्यासाठी येत आहेतरुई बु येथील श्रीक्षेत्र सिद्धेशर पंढरपूर या ठिकाणी दिनांक २९ जुन रोजी संत हरिओम बाबा यांच्या नेतृत्वाखाली बळेगाव, सातेगाव रामेश्वर संत परबतेश्वर महाराज माळ ईकळी कारखाना दुर्गा देवी रुई बु ते श्री क्षेत्र सिद्ध सिद्धेशर पंढरपूर येथे भव्य दिंडीची सांगता करण्यात आली आहे
व प्रसिद्ध कीर्तनकार किशन महाराज बरबडेकर यांचा रात्रीला ठीक ९ वाजता प्रारंभ होणार असून या कीर्तनाचा अवश्य लाभ घ्यावा असे संत हरिओम बाबा यांनी आवाहन केले आहे

0 Comments