Header Ads Widget

ग्रा.पं.सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करणस एक वर्षाची मुदतवाढ आ. राम पाटील रातोळीकर यांच्या पाठपुराव्याला यश

विशेष प्रतिनिधी : बाळासाहेब पांडे :-

ग्रामपंचायत निवडणुकीत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे

या संदर्भात आ. राम पाटील रातोळीकर यांनी सर्वप्रथम मुंबई येथे ३१ मे रोजी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन आणि त्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्याकडे नांदेड येथे पाठपुरावा केला होता.
  
जिल्हाधिकार्‍यांनी जिल्ह्यातील १३८३ ग्राम पंचायत सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल न केल्यामुळे त्यांना अपात्र केले होते.

परंतु काही सदस्यांनी जात पडताळणीसाठी कागदपत्रे जमा केली असता त्यांची जात पडताळणी होऊन त्याचा संदेश संबंधित सदस्यांना ईमेल वर देखील पाठविण्यात आला होता. परंतू याचे ज्ञान या अपात्र सदस्यांना नसल्याकारणाने ते हे ईमेल संदेश पाहु शकले नाहीत

व जिल्हाधिकार्याकडे हा जात पडताळणी झालेला प्रस्ताव दाखल करू शकले नाहीत,याशिवाय एस. टी. प्रवर्गातील ३२६ सदस्य हे गुंतागुंतीचे आहेत त्यामुळे त्यांना न्याय मिळणे गरजेचे आहे.

तसेच अनुसूचित जाती प्रवर्गातील ५४५ सदस्य व ओबीसी प्रवर्गातील ५१२ सदस्यांना कसल्याच प्रकारचा अडथळा नसतांना देखील जात पडताळणी अधिकार्‍यांनी हलगर्जीपणा व टाळाटाळ केल्यामुळे जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करू शकले नाहीत

त्यामुळे या सदस्यांना जात पडताळणी प्रमाणपत्र दाखल करण्यासाठी वेळ देण्यात यावा.त्यासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला  तात्काळ स्थगिती द्यावी, अशी मागणी आ. राम पाटील रातोळीकर यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नांदेड दौर्‍यात एका निवेदनाद्वारे केली होती. या मागणी संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासनही फडणवीस यांनी दिले होते.
   
बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास एक वर्षाची मुदताढ देण्याचा निर्णय झाल्याने अपात्र ठरविलेल्या सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून त्यांचा न्याय मुद्दा शासनस्तरावर लावून धरल्याबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा केल्याबद्दल आ. राम पाटील  रातोळीकर यांचे आभार मानले आहेत.

Post a Comment

0 Comments