Header Ads Widget

कृष्णूर विद्युत वितरण युनिटच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी १२० डीपी मंजूर तर ४० पूर्ण मीटर बसविणे बाकी - सहाय्यक अभियंता जाधव यांची माहिती

       माधव पवार
नायगाव तालुक्यातील कृष्णूर विद्युत वितरण युनिटच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी १२० डीपी मंजूर करण्यात आल्या असून या पैकी ४० डीपी पूर्ण झाल्या असल्या तरी मीटर बसविणे बाकी बसविने बाकी असल्याचे कृष्णूर वितरण कंपनीचे युनिटचे कर्तव्यदक्ष  सहाय्यक अभियंता जाधव यांची माहिती दिली आहे

तालुक्यातील विद्युत वितरण कंपनी युनिट कृष्णुरचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी यांच्या कार्यकाळात मोठया प्रमाणात शेतकऱ्यांच्या हितासाठी व त्यांच्या शेती पंपासाठी कसल्याची अडचण भासू नये म्हणून शासनाकडे पाठपुरावा करून मंजूर करून घेतला असला तरी उर्वरित शेती पंपाचे शेतकऱ्यांना कधी बसवणार असा प्रश्न चर्चेला जात आहे

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी युनिट कृष्णूर अंतर्गत डीपीचे काम करणारे गुत्तेदार कोण ? अधिकाऱ्यानी मंजूर केलेल्या शेतकऱ्याच्या डीपी गुत्तेदारा कडून बसविले जात नाहीत काही तांत्रिक अडचण असेल त्या गुत्तेदारानी संबंधित अधिकाऱ्याना भेट नाहीत असा प्रश्न ही शेतकऱ्यांतुन उपस्थित केला असल्यामुळे सध्या पावसाळ्याचे दिवस चालू झाले असल्याने ते तात्काळ करण्यात यावे अशी मागणी होत आहे

विद्युत वितरणचे सहाय्यक अभियंता जाधव यांनी शेतकऱ्यांच्या कृषी पंपासाठी १२० डीपी मंजूर करण्यात आल्या असताना सुद्धा गुत्तेदाराच्या दिरंगाई पणामुळे एकूण ८० डीपीचे काम करण्यात आले नसल्याचे शेतकऱ्यातून सांगितल्या जात आहे 

Post a Comment

0 Comments