Header Ads Widget

उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रक आग काळे सोने जळून खाक चांपा टोलनाक्या जवळील घटना


नागपूर /चांपा प्रतिनिधी : मिताराम भोसले 

उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी वरील उमरेड नागपूर रस्त्यावरील चांपा गावाजवळील टोल नाका संकुलात रविवार सायंकाळी ६.४० च्या सुमारास कोळसा भरलेल्या ट्रकला अचानक आग लागली. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. पण ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला आहे
ट्रक क्र. एमएच ४० बीजी ५८७१ हा १६ चाकी ट्रक डब्ल्यूसीएल उमरेड कोळसा खाणीतून ४० टन कोळसा भरून खापरखेडा नागपूर कंपनीकडे जात होता. उमरेड नागपूर राष्ट्रीय महामार्ग ३५३ डी चांपा टोल नाक्याच्या आवारात ट्रकमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने चालकाने ट्रक टोल नक्याचा आवारातच रस्त्याच्या कडेला उभा केला आहे 

ट्रकमधून येत असलेला धूर वाढत असल्याचे पाहून ट्रकचालक तात्काळ बाहेर पडला. आणि काही वेळातच ट्रकने पेट घेतला
ट्रकचालक दुर्योधन ठाकरे (वय ३२ रा. खापरखेडा नागपूर) यांनी घटनेची माहिती चांपा टोल नाक्याच्या एसआय लकी चंद्रवंशी यांना दिली. एसआय लकी यांनी तात्काळ याची माहिती कुही पोलिसांचे एसएचओ नितेश डोर्लीकर यांना दिली. पाचगाव पोलीस चौकीचे पोलीस हवालदार चांगदेव कुथे, पोलीस हवालदार आशिष खंडाईत यांनी घटनेचा पंचनामा केला आहे 

उमरेड नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली. परंतु घटनेत ट्रक जळून खाक झाला. त्यात लाखो रुपयांचे नुकसान झाले. अग्निशमन बंबाच्या मदतीने आग विझविण्यात आली आणि स्थितीवर नियंत्रण मिळविले आहे 




Post a Comment

0 Comments